सोशल मीडियावर ‘आमचं ठरलं’ म्हणत प्रेमाची कबुली देण्याचा ट्रेंड आला आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अनेक मराठमोळ्या कलाकारांनी सोशल मीडियावरून जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली. मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, स्वानंदी टिकेकर, आशिष कुलकर्णी, सई ताम्हणकर, अनिश जोग या कलाकारांनी थेट सोशल मीडियावरून आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्या पाठोपाठ आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने प्रेमाची कबुली देत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. (Arti More Romantic Post)
‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेतील पिंकी म्हणजेच अभिनेत्री आरती मोरे. आरतीने आजवर तिच्या अभिनयातून चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या आरतीने चाहत्यांसह एक गुडन्यूज शेअर केली. इंस्टाग्रामवर तिने बॉयफ्रेंडबरोबरचा एक फोटो पोस्ट करत चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तिने इन्स्टाग्रामवर पोस्टद्वारे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
इंस्टाग्रामवरून तिने बॉयफ्रेंडबरोबरचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, “’असणं’ हा शब्द मानवी रुपात आला तर त्याला तू तुझ्याशिवाय दुसरा पर्याय ठेवणार आहेस का?? कसं जमत तुला? कसं? थँक यु वगैरे खूप फॉर्मल नको बोलायला आता मी! आय लव्ह यू जानेमन, वाढदिवसाच्या शुभेच्छा”, असं म्हटलं आहे. आरती मोरे आणि अक्षय पाटील हे दोघेही कॉलेजपासूनचे मित्र आहेत. दोघेही एकमेकांसाठी काही ना काही पोस्ट नेहमीच शेअर करताना दिसत असतात. आरती मोरे ही गेल्या कित्येक वर्षांपासून अक्षय पाटीलला डेट करत आहे. अक्षय ही मराठी सिनेसृष्टीत कार्यरत आहे. ‘दशमी क्रिएशन्स’च्या निर्मिती संस्थेसाठी तो काम करत आहे. अक्षयच्या वाढदिवसानिमित्त अखेर आरतीने प्रेमाची जाहीर कबुली दिली.
आरतीची ‘दादा एक गूड न्यूज आहे’ या लोकप्रिय नाटकातली भूमिका विशेष गाजली. तसेच ‘लोकमान्य’ मालिकेतील यशोदाबाई आगरकर या भूमिकेमुळे तिने लोकप्रियता मिळवली. सध्या आरती ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेत पिंकीची भूमिका साकारत आहे.