रविवार, जून 7, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील पिंकीने दिली प्रेमाची कबुली, बॉयफ्रेंडबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाली, “तुझ्याशिवाय…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 22, 2023 | 1:41 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Arti More Romantic Post

'पिंकीचा विजय असो' मालिकेतील पिंकीने दिली प्रेमाची कबुली, बॉयफ्रेंडबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाली, "तुझ्याशिवाय…"

सोशल मीडियावर ‘आमचं ठरलं’ म्हणत प्रेमाची कबुली देण्याचा ट्रेंड आला आहे, असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही. अनेक मराठमोळ्या कलाकारांनी सोशल मीडियावरून जाहीरपणे प्रेमाची कबुली दिली. मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, स्वानंदी टिकेकर, आशिष कुलकर्णी, सई ताम्हणकर, अनिश जोग या कलाकारांनी थेट सोशल मीडियावरून आपल्या प्रेमाची कबुली दिली. त्या पाठोपाठ आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीने प्रेमाची कबुली देत चाहत्यांना गुडन्यूज दिली आहे. (Arti More Romantic Post)

‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेतील पिंकी म्हणजेच अभिनेत्री आरती मोरे. आरतीने आजवर तिच्या अभिनयातून चाहत्यांच्या मनात घर केलं आहे. सोशल मीडियावर सक्रिय असलेल्या आरतीने चाहत्यांसह एक गुडन्यूज शेअर केली. इंस्टाग्रामवर तिने बॉयफ्रेंडबरोबरचा एक फोटो पोस्ट करत चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली आहे. तिच्या बॉयफ्रेंडच्या वाढदिवसाचे औचित्य साधत तिने इन्स्टाग्रामवर पोस्टद्वारे त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आणखी वाचा – “गरोदर असताना सोडावं लागलं घर”, समिधा गुरूने सांगितला हक्काचं घर घेण्यापूर्वीचा कठीण प्रसंग, म्हणाली, “एवढं मोठं पोट घेऊन…”

View this post on Instagram

A post shared by arti more (@arti.more18)

इंस्टाग्रामवरून तिने बॉयफ्रेंडबरोबरचा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, “’असणं’ हा शब्द मानवी रुपात आला तर त्याला तू तुझ्याशिवाय दुसरा पर्याय ठेवणार आहेस का?? कसं जमत तुला? कसं? थँक यु वगैरे खूप फॉर्मल नको बोलायला आता मी! आय लव्ह यू जानेमन, वाढदिवसाच्या शुभेच्छा”, असं म्हटलं आहे. आरती मोरे आणि अक्षय पाटील हे दोघेही कॉलेजपासूनचे मित्र आहेत. दोघेही एकमेकांसाठी काही ना काही पोस्ट नेहमीच शेअर करताना दिसत असतात. आरती मोरे ही गेल्या कित्येक वर्षांपासून अक्षय पाटीलला डेट करत आहे. अक्षय ही मराठी सिनेसृष्टीत कार्यरत आहे. ‘दशमी क्रिएशन्स’च्या निर्मिती संस्थेसाठी तो काम करत आहे. अक्षयच्या वाढदिवसानिमित्त अखेर आरतीने प्रेमाची जाहीर कबुली दिली.

आणखी वाचा – “तिच्या डोळ्यातलं कौतुक आणि…”, सलील कुलकर्णी यांची आईसाठी भावुक पोस्ट, लहानपणीचा फोटो शेअर करत म्हणाले, “सगळं अगदी तसंच…”

आरतीची ‘दादा एक गूड न्यूज आहे’ या लोकप्रिय नाटकातली भूमिका विशेष गाजली. तसेच ‘लोकमान्य’ मालिकेतील यशोदाबाई आगरकर या भूमिकेमुळे तिने लोकप्रियता मिळवली. सध्या आरती ‘पिंकीचा विजय असो’ या मालिकेत पिंकीची भूमिका साकारत आहे.

Tags: arti moreentertainmentmarathi actressmarathi malikamarathi serialpinkicha vijay aso
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
late night eating
Entertainment

रात्री नऊ नंतर जेवताय?, हृदयाच्या आरोग्यावर होऊ शकतो मोठा परिणाम, वाचा सविस्तर

जून 6, 2026 | 12:08 pm
 Tea And Health
Entertainment

चहा पिण्याला कोणतं वय योग्य?, आजारी पडण्याआधी जाणून घ्या सविस्तर…

जून 5, 2026 | 12:10 pm
Does Coffee Cause Dehydration
Entertainment

कॉफी प्यायल्याने Dehydration कमी होते का?, मोठा गैरसमज होणार दूर, वाचा सविस्तर

जून 4, 2026 | 12:00 pm
Next Post
Samidha Guru On Nameplate

प्राजक्ताची फुलं, कोरीव काम अन्…; 'या' जवळच्या व्यक्तीने बनवली आहे समिधा गुरूच्या दारावरील नेमप्लेट, पाहताक्षणी व्हाल थक्क, पाहा व्हिडीओ

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.