मंगळवार, एप्रिल 21, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

प्राजक्ताची फुलं, कोरीव काम अन्…; ‘या’ जवळच्या व्यक्तीने बनवली आहे समिधा गुरूच्या दारावरील नेमप्लेट, पाहताक्षणी व्हाल थक्क, पाहा व्हिडीओ

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 22, 2023 | 3:21 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Samidha Guru On Nameplate

प्राजक्ताची फुलं, कोरीव काम अन्…; 'या' जवळच्या व्यक्तीने बनवली आहे समिधा गुरूच्या दारावरील नेमप्लेट, पाहताक्षणी व्हाल थक्क, पाहा व्हिडीओ

स्वतःच, हक्काचं घर असावं असं प्रत्येकाला वाटतं. आणि प्रत्येकाने पाहिलेलं हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जो तो धडपड करत असतो. घर घेतल्यानंतर घराची सजावट ते घरावर लावायची नेमप्लेट इथपर्यंत सर्व काही जसं जमेल तसं करत असतो. असंच काही वर्षांपूर्वी स्वतःच्या घराचं स्वप्न एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं पूर्ण झालं. अभिनेत्री समिधा गुरु हीच घर घेण्याचं सवपन पूर्ण झालं शिवाय तिला हवी तशी नेमप्लेट दाराबाहेर असण्याची तिची इच्छाही पूर्ण झाली. ही तिची इच्छा तिच्या जवळच्या व्यक्तीने पूर्ण केली. (Samidha Guru On Nameplate)

इट्स मज्जाच्या माझ्या घराची गोष्ट या कार्यक्रमात बोलत असताना समिधाने घराबद्दलच्या अनेक आठवणी ताज्या केल्या. यावेळी तिने तिच्या दारावर असणाऱ्या नेमप्लेटमागील स्टोरी सांगितली. याबाबत बोलताना समिधा म्हणाली, “‘गुरु’ या आडनावांतच आमच्या सर्वकाही आहे. मला लहानपणापासूनच प्राजक्ताची फुलं आवडतात. माझ्या घरी दरवाज्यातच प्राजक्ताचं झाड होतं आणि त्याची पडलेली फुलं मी वेचून दररोज देवाला वाहायचे. या लहानपणीच्या आठवणी असल्याने मला ती आवड जोपासायची होती. पण इथे कुठे प्राजक्ताचं झाड लावणार.

आणखी वाचा – “गरोदर असताना सोडावं लागलं घर”, समिधा गुरूने सांगितला हक्काचं घर घेण्यापूर्वीचा कठीण प्रसंग, म्हणाली, “एवढं मोठं पोट घेऊन…”

समिधा पुढे म्हणाली, “मग दाराबाहेर प्राजक्ताचं झाड नाहीतर निदान नेमप्लेट असावी असं मी घर घेतलं तेव्हा ठरवलं होतं. आणि तेव्हापासून मी त्या नेमप्लेटच्या शोधात होते. ही नेमप्लेट माझी नणंद विदुला पाठक यांनी बनवली आहे. त्यांना मी सांगितलं की, मला अशी नेमप्लेट हवी आहे. यावर ती म्हणाली, तू शोधते कशाला मी बनवते. मी विचारलं तुम्हाला येते का ? तर त्या नाही म्हणाल्या. क्रिएटिव्ह काम त्या करतच असतात. त्यावेळी माझ्या घराची नेमप्लेट बनवण्यासाठी, ती प्राजक्ताची फुलं बनवण्यासाठी त्या माझ्यासाठी ती कला शिकल्या.”

आणखी वाचा – ‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील पिंकीने दिली प्रेमाची कबुली, बॉयफ्रेंडबरोबरचा फोटो शेअर करत म्हणाली, “तुझ्याशिवाय…”

नेमप्लेटची स्तुती करत समिधा म्हणाली, “मला त्यांनी तुला हवी तशी नेमप्लेट बनवून देणार असं वचन दिलं होतं, त्याप्रमाणे त्यांनी मला नावाची पाटी बनवून दिली. ज्यावेळी मी ती नेमप्लेट पाहिली तेव्हा मला स्वतःला आश्चर्याचा धक्का बसला. इतकी सुंदर नेमप्लेट असेल अशी मी कल्पना केली नव्हती. ही नावाची पाटी माझ्यासाठी खूप खास आहे. आज तिच्यामुळे मला आवडणार प्राजक्ताचं झाड माझ्या दाराबाहेर आहे.”

Tags: abhijeet guruentertainmentmarathi actressmarathi malikamarathi moviemarathi serialmazya gharachi gosht itsmajjamazya gharachi goshtasamidha gurusamidha guru on nameplate
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Deepali Sayed First Post After Bigg Boss Marathi 6
Entertainment

पाच लाखांची बॅग सोडली आणि…; एलिमिनेट झाल्यानंतर दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली, “माझ्यासाठी…”

एप्रिल 20, 2026 | 11:29 am
Next Post
Prajakta Mali On Aditi Tatkare

प्राजक्ता माळीचा राजकारणात प्रवेश? आदिती तटकरेंसह कार्यक्रमाला हजेरी, फोटो पोस्ट करत म्हणाली, "लवकरच एकत्र…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.