रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“तिच्या डोळ्यातलं कौतुक आणि…”, सलील कुलकर्णी यांची आईसाठी भावुक पोस्ट, लहानपणीचा फोटो शेअर करत म्हणाले, “सगळं अगदी तसंच…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
ऑक्टोबर 22, 2023 | 11:19 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Saleel Kulkarni Emotional Post

"तिच्या डोळ्यातलं कौतुक आणि…", सलील कुलकर्णी यांची आईसाठी भावुक पोस्ट, लहानपणीचा फोटो शेअर करत म्हणाले, "सगळं अगदी तसंच…"

देशातील सर्वात प्रतिष्ठित चित्रपट पुरस्कारांपैकी एक असलेल्या ६९वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा नुकताच पार पडला. या कार्यक्रमादरम्यानचे खास क्षण प्रत्येकजण सोशल मीडियावरून शेअर करताना दिसत आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते यंदाच्या पुरस्कार विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. यंदा हिंदी व दाक्षिणात्य चित्रपटांसह मराठी चित्रपटांनीही पुरस्कारांवर नाव कोरलं. नेहमीप्रमाणे यंदाच्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठी चित्रपटांनी आपली छाप पाडली. सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार सलील कुलकर्णी यांच्या ‘एकदा काय झालं’ या चित्रपटाने पटकावला. (Saleel Kulkarni Emotional Post)

या पुरस्कार सोहळ्याला सलील कुलकर्णी यांनी कुटुंबासह हजेरी लावली होती. या सोहळ्यादरम्यानचा एक भावुक करणारा फोटो त्यांनी सोशल मीडियावरून शेअर केला आहे. इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट करत त्यांनी एक लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांच्या आई बरोबरचा फोटो पोस्ट केला आहे. एका फोटोमध्ये सलील यांची आई त्यांना राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला देण्यात येणारा बॅच लावताना दिसत आहे. तर आणखी एक शेअर केलेला त्यांचा हा फोटो लहानपणीचा असलेला पाहायला मिळतोय. या फोटोमध्ये त्यांच्या आईने सलील यांना कडेवर उचलून घेतलेलं पाहायला मिळतंय.

आणखी वाचा – मला गरज होती तेव्हा तू… होणाऱ्या नवऱ्यासाठी आमिरच्या लेकीने केलेली पोस्ट चर्चेत, Unseen Photo होतायत व्हायरल

सलील यांनी आईबरोबरचे हे फोटो शेअर करत लक्षवेधी कॅप्शन दिलं आहे, “बालवाडीत शाळेत जातांना तिने माझ्या शर्टाला पिनअप केलेला रूमाल ते राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्याला लावलेला हा विशेष बॅच. सगळं अगदी तसंच आहे. तिच्या डोळ्यातलं कौतुक आणि माझं तिला “आई… हे करून दे ना” हे सांगणं.” असं म्हणत त्यांनी ही पोस्ट शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टवर अनेक कलाकार मंडळींनी तसेच त्यांच्या चाहत्यावर्गाने कमेंट व लाईक्सचा वर्षाव केला आहे. सलील यांनी त्यांच्या चित्रपटाला मिळालेला पुरस्कार त्यांच्या कुटुंबियांना समर्पित केला आहे.

View this post on Instagram

A post shared by Saleel Kulkarni (@saleelkulkarniofficial)

आणखी वाचा – Video : मंचावर माधुरी दीक्षितबरोबर थिरकली ‘नवा गडी नवा राज्य’मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “ती आली तिने पाहिलं आणि…”

‘एकदा काय झालं’ या चित्रपटात डॉ. सलील कुलकर्णी यांनी एका गोष्ट सांगणाऱ्या बाबाची कहाणी सादर केली आहे. या चित्रपटाचं लेखन,पटकथा,संवाद,संगीत व दिग्दर्शन डॉ. सलील कुलकर्णी यांनी केलं आहे. या चित्रपटात अभिनेता सुमित राघवन, मोहन आगाशे, पुष्कर श्रोत्री, अभिनेत्री उर्मिला कानिटकर, सुहास जोशी यांसारख्या अनेक दिग्गज कलाकारांच्या भूमिका होत्या.

Tags: 69th national film award69th National Film Awards 2023ekda kay zalentertainmentmarathi directormarathi filmmarathi moviesaleel kulkarni
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Dalip Tahil Jail

५ वर्ष जुनी घटना, नशेत चालवलेली गाडी अन्…; 'बाजीगर' फेम दलीप ताहिल यांना होणार २ महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा, नेमकं काय घडलं होतं?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.