सध्या विनोदी व सामाजिक विषयांवर आधारित असलेल्या चित्रपटांकडे मराठी प्रेक्षकांचा कल जास्त आहे. त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक जुने व नव्या दमाचे दिग्दर्शक याच धाटणीचे चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चित्रपटात हे विषय हाताळताना त्यात असलेले वेगळेपण यांमुळे तो प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. अश्याच धाटणीचा एक आगळावेगळा विनोदी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, तो म्हणजे “पिल्लू बॅचलर”. (Pillu Bachelor movie poster out)
आपल्या दमदार लेखणीसाठी ओळखले जाणारे अरविंद जगताप लिखित व तानाजी घाडगे दिग्दर्शित “पिल्लू बॅचलर” हा चित्रपट येत्या दिवाळीला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विनोदी व गंभीर भूमिका सहजगत्या साकारणारा अभिनेता पार्थ भालेराव या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा पोस्टर सोशल मीडियाद्वारे प्रदर्शित करण्यात आलं आहे. ज्यात पार्थ भालेराव एका वेगळ्या अंदाजात दिसला आहे.
या चित्रपटात पार्थसह अभिनेत्री सायली संजीव, अक्षया देवधर, शिवाली परब, अक्षय टंकसाळे, शशांक शेंडे, मोहन आगाशे, सविता मालपेकर, भारत गणेशपुरे, स्वप्निल राजशेखर, योगेश शिरसाट, स्नेहल शिदम, रोहित चव्हाण, रुचिता जाधव, कल्पना जगताप अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.
हे देखील वाचा – “वडिलांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी त्याने…”, मराठमोळ्या डान्सरसाठी मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले, “दुःखद घटनेनंतर तो…”
प्रदर्शित झालेल्या पोस्टरनुसार, पार्थच्या चेहऱ्यावरील हावभावांवरून आणि चित्रपटाच्या नावावरून एक हलकीफुलकी कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांमध्ये याविषयीची उत्सुकता वाढली आहे.
हे देखील वाचा – सात बायकांच्या आयुष्यावर येणार आणखी एक कथा ,सुकन्या मोने, प्रार्थना बेहरे यांच्यासह स्वप्निल जोशी दिसणार मुख्य भूमिकेत
गणेश मार्केटिंग अँड फिल्म्सतर्फे या चित्रपटाची प्रस्तुती करण्यात आली असून सुनील राजाराम फडतरे, वर्षा मुकेश पाटील, अभिजीत देशपांडे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. गीत मंगेश कागणे यांनी, तर चिनार महेश यांचे संगीत असणार आहे. सूर्या मिश्रा यांनी छायांकन तर अनंत कामथ यांनी संकलनाची जबाबदारी निभावली आहे. (Pillu Bachelor movie)