प्रेक्षकांच्या मनाला अनेक चित्रपट, मालिका आणि प्रेक्षक भुरळ पाडत असतात. मराठी चित्रपटांकडे प्रेक्षकांचा कल सध्या वाढताना दिसतोय त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टीला पुन्हा एकदा सोन्याचे दिवस आले असं म्हणायला हरकत नाही. सैराट, वेड, बाई पण भारी देवा या चित्रपटांनी मराठी चित्रपटसृष्टी पुन्हा एकदा समृद्ध केली आणि आता अनेक चित्रपट, नाटक देखील प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.
असाच आणखी एक चित्रपट सध्या प्रेक्षकांच्या मनोरंजन करण्यासाठी येणार असल्याची बातमी समोर आली आहे. अभिनेत्री प्रार्थना बेहरे, सुकन्या मोने, स्वप्नील जोशी अशा तगड्या स्टार कास्ट सहित ‘इंद्रधनुष्य’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं शूटिंग देखील परदेशात सुरु झालं झाल्याचं सांगितलं आहे.(Sukanya Mone New Movie indradhanushya)
चित्रपटाची कथा एक पुरुष आणि सात बायका या कथानकावर आधारित असून अतिशय धमाल आणि मनोरंजक अशी आहे. लंडनमध्ये घडणाऱ्या या कथानकावरील चित्रपटाचं चित्रीकरण लंडनमध्ये सुरू झालं आहे. या चित्रपटामुळे अभिनेता स्वप्नील जोशी पहिल्यांदाच लंडनमध्ये चित्रपटाच्या चित्रीकरणाचा अनुभव घेत आहे. पांडुरंग जाधव यांनी आतापर्यंत केलेले तीनही चित्रपट उत्तम गोष्ट सांगणारे असल्यानं “इंद्रधनुष्य” या चित्रपटातही त्यांच्या दिग्दर्शनाचे आणि सर्व स्टारकास्टच्या अभिनयाचे सप्तरंग दिसतील याची नक्कीच खात्री आहे.(prarthana behere)
प्रार्थना बेहेरे, दीप्ती देवी, अदिती सारंगधर, सुकन्या मोने, नम्रता गायकवाड, नेहा खान, श्वेता पाटील अशी दमदार स्टारकास्ट असून चित्रपटाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त नुकताच करण्यात आला. आशिष अग्रवाल यांच्या एबीसी क्रिएशन्स या निर्मिती संस्थेच्या माध्यमातून “इंद्रधनुष्य” चित्रपटाची निर्मिती करण्यात येत असून नितीन वैद्य चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन पांडुरंग जाधव, पटकथा पांडुरंग जाधव, विपुल देशमुख आणि संवादलेखन विपुल देशमुख यांचेच आहे. नागराज दिवाकर छायांकनाची, वरुण लखाते संगीत दिग्दर्शनाची तर निलेश गावंड संकलनाची जबाबदारी सांभाळणार आहेत.(Sukanya Mone New Movie indradhanushya)