रविवार, एप्रिल 19, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

सई ताम्हणकरणच्या ड्रायव्हरला तरुणांकडून बेदम मारहाण कारण…; पोलिसांपर्यंत पोहोचलं प्रकरण

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 16, 2023 | 5:58 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
sai tamhankar driver beaten by bike riders

सई ताम्हणकरच्या ड्रायव्हरला तरुणांकडून बेदम मारहाण कारण...; पोलिसांपर्यंत पोहोचलं प्रकरण

मराठीमध्ये सतत चर्चेत राहणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सई तिच्या कामाबरोबरच खासगी आयुष्यामुळेही चर्चेचा विषय ठरते. आताही ती एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. सईच्या ड्रायव्हरला चार अनोळखी तरुणांनी मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अगदी शुल्लक कारणावरुन ड्रायव्हरला मारहाण करण्यात आली आहे. सध्या या प्रकाराबाबत सगळीकडेच चर्चा सुरु आहे.

सईचा ड्रायव्हर सद्दाम मंडल हा ३२ वर्षांचा आहे. ‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या वृत्तानुसार, मालाड परिसरामध्ये सद्दामबरोबर ही घटना घडली. दुचाकीवर असणारे तरुण वेडीवाकडी गाडी चालवत होते. ते पाहता सद्दामने दोनवेळा हॉर्न वाजवला. मात्र या तरुणांनी सद्दामने हॉर्न वाजवला म्हणून त्याला थेट मारहाण करण्यास सुरुवात केली.

आणखी वाचा – वडिलांच्या निधनानंतर रुग्णालयात भरती होती गश्मीरची आई, अभिनेत्याचा खुलासा, म्हणाला, “आई आता…”

सद्दामने हॉर्न वाजवल्यामुळे तरुणांना राग अनावर झाला. या संपूर्ण प्रकारामध्ये जखमी झालेल्या सईच्या ड्रायव्हरला रुग्णालयामध्ये भरती करण्यात आलं. रविवारी (१३ ऑगस्ट) हा संपूर्ण प्रकार घडला. सद्दाम सईच्या गाडीमधून त्याच्या घरी जात असताना त्याला या प्रसंगाचा सामना करावा लागला. सद्दामला मारहाण केल्याप्रकरणी या तरुणांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

आणथी वाचा – “वडिलांच्या निधनाच्या तिसऱ्या दिवशी त्याने…”, मराठमोळ्या डान्सरसाठी मिलिंद गवळींची पोस्ट, म्हणाले, “दुःखद घटनेनंतर तो…”

View this post on Instagram

A post shared by Sai (@saietamhankar)

पण सद्दामला मारहाण करणारे तरुण नेमके कोण होते? याचा तपास पोलीस करत आहेत. गेल्या सहा वर्षांपासून सद्दाम सईकडे ड्रायव्हर म्हणून काम करत आहे. या प्रकरणामध्ये पुढे काय घडणार? हे येत्या काही दिवसांमध्ये समोर येईल. पण सध्या तरी सईने या संपूर्ण प्रकाराबाबत बोलणं टाळलं आहे. सई सध्या तिच्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये व्यग्र आहे. शिवाय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ कार्यक्रमालाही आता सुरुवात झाली आहे. या कार्यक्रमाच्या परीक्षक पदी सई आहे.

Tags: marathi actressmarathi moviemarathi serialsai tamhankar
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Actress Rejection
Entertainment

“पुरुषी आवाजामुळे दिग्दर्शकाने अपमान केला”, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केली खंत, म्हणाली, “इतका मोठा ट्रॉमा…”

एप्रिल 19, 2026 | 11:11 am
Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
Next Post
Sakhi Gokhale On Suvrat Joshi

'ताली' वेबसीरिजमध्ये तृतीयपंथीयांच्या वेशात सुव्रत जोशीला पाहिल्यानंतर बायकोची पहिली प्रतिक्रिया, म्हणाली, "तुझ्याबरोबर राहूनसुद्धा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.