Payal Rohatgi Slams Anupamaa Actress Rupali Ganguly : ‘अनुपमा’ फेम अभिनेत्री रुपाली गांगुली सध्या तिच्या सावत्र मुलीमुळे चर्चेत आली आहे. अलीकडेच तिची सावत्र मुलगी ईशा वर्माने अभिनेत्रीवर धक्कादायक आरोप केले आहेत. आता अलीकडेच रुपालीने ईशावर ५० कोटी रुपयांचा मानहानीचा खटला दाखल केला आहे. या सगळ्या प्रकरणात आता पायल रोहतगीची एन्ट्री झाली आहे. रुपाली गांगुलीचा हा कौटुंबिक वाद सध्या चर्चेत आला आहे. रुपालीची सावत्र मुलगी ईशा वर्माने तिच्याविरोधात काही धक्कादायक दावे केले आहेत. ईशाने सांगितले की, रुपालीचे तिचे वडील अश्विन वर्मा यांच्याबरोबर विवाहबाह्य संबंध होते आणि त्यामुळे तिचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. एवढेच नाही तर ईशाने रुपालीवर बॉडी शेमिंग आणि धमकावल्याचा आरोपही केला आहे.
या सगळ्यात रुपालीने मौन बाळगणे योग्य मानले असतानाच तिने ईशावर ५० कोटी रुपयांचा मानहानीचा दावा करुन सर्वांनाच चकित केले. रुपालीच्या या कृत्याविरोधात पायल रोहतगीने नाराजी व्यक्त केली आहे. पायल रोहतगीने ईशाच्या विरोधात हे पाऊल उचलल्याने रुपाली गांगुलीवर उघडपणे टीका केली आहे. पायल रोहतगी ‘सीआयडी’, ‘बिग बॉस’, ‘लॉक अप’, ‘फियर फॅक्टर 2’ आणि ‘फियर फॅक्टर: खतरों के खिलाडी १’ सह इतर अनेक शोमध्ये दिसली आहे. आता अभिनेत्री रुपालीच्या मुद्द्यावर बोलल्यामुळे चर्चेत आली आहे. रुपालीच्या बदनामी प्रकरणाचा अहवाल शेअर करणारी एक पोस्ट अभिनेत्रीने शेअर केली. या पोस्टमध्ये तिने आधीच लग्न झालेल्या अश्विनशी लग्न करुन जे काम केले आहे त्याला ‘कर्म’ असे म्हटले आहे.
आणखी वाचा – Video : नातवाबरोबर स्वतःही लहान झाले अरुण कदम, दोघांचा एकत्रित भन्नाट डान्स, क्युट व्हिडीओ तुफान व्हायरल
तिने पुढे असं म्हटलं आहे की, इतरही पर्याय होते आणि बदनामीच्या एवढ्या मोठ्या रकमेची मागणी करण्याऐवजी न्यायालयात पुरावे घेऊन हे प्रकरण सोडवता आले असते. पायलने रुपालीला पुढे विचारले की ती गरीब झाली आहे का? याशिवाय तिला इतक्या पैशाची किंमत समजली का?, असंही विचारले. तिने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे, ज्यामध्ये तिने म्हटले आहे की, “रुपाली तुझे सत्य काहीही असो, पण तू एका व्यक्तीशी लग्न केले आहेस ज्याला तू भेटलीस तेव्हा त्याचं लग्न झालं होतं. त्याच्या आधीच्या बायकोबरोबर तू जे काही वागलीस त्याला कर्म म्हणतात. आधीच्या बायकोच्या मुलीची स्वतःची गोष्ट असेल. बाकी तुमच्या पुराव्यानिशी कोर्टात सर्व हाताळता आलं असतं. पण बदनामीची एवढी मोठी रक्कम का मागितली? तू गरीब झाली आहेस का?, मालिकांमध्ये काम केल्यानंतर ५० कोटी रुपये कमवायचे म्हणजे काय ते समजले का?”.
आणखी वाचा – Video : ऐश्वर्या नारकर नक्की कसं आयुष्य जगतात?, व्हिडीओ शेअर करत सांगितलं संपूर्ण दिवसाचं शेड्युल
‘अनुपमा’ या टीव्ही शोने रुपाली गांगुलीला खूप नाव आणि प्रसिद्धी मिळवून दिली. रिपोर्ट्सनुसार, ती सध्या सर्वाधिक मानधन घेणाऱ्या टेलिव्हिजन अभिनेत्रींपैकी एक आहे. एका रिपोर्टनुसार, त्याला फीमध्ये मोठी रक्कम मिळते. शोमधील भूमिकेसाठी तिला प्रति एपिसोड तीन लाख रुपये मिळतात.