उत्तम अभिनय आणि विनोदाचं अचूक टायमिंग साधत प्रेक्षकांना खळखळवून हसवणारे अरुण कदम मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते आहेत. आजवर अनेक विनोदी कार्यक्रम आणि अनेक चित्रपटांतून विविधांगी भूमिका साकारत अरुण कदम यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला. गेल्या कित्येक वर्षांपासून ते प्रेक्षकांचं अविरत मनोरंजन करत आहेत. ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून प्रसिद्धीझोतात आलेल्या अरुण कदम यांना कोणत्या वेगळ्या ओळखीची गरज नाही. त्यांच्या विनोदाचे लाखो चाहते आहेत. काही दिवसांपूर्वीच अरुण कदम आजोबा झाले. (Arun Kadam Fun With Grandson)
आपल्या विनोदी भूमिकांनी चर्चेत असणारे हे अरुण कदम हे सोशल मीडियावरही तितकेच सक्रिय असतात. सोशल मीडियावर ते त्यांची पत्नी, लेक व नातवाबरोबरचे काही फोटो व व्हिडिओ शेअर करत असतात. अशातच अरुण कदम यांनी नुकताच शेअर केलेला नातवाचा व्हिडीओ सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. आजच्या बालदिनाचे औचित्य साधता अरुण कदम यांनी नातवाचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्यांनी हा खास व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओमध्ये आजोबा व नातवाचे खास नाते पाहायला मिळत आहे.
अरुण कदम यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये ते आपल्या नातवाबरोबर त्याच्याच स्टाइलमध्ये डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. अरुण कदम यांचा नातू त्याच्या चिमुकल्या पावलांची हालचाल करत आहे. अगदी तसंच अरुण कदमही आपल्या नातवाप्रमाणे दुडूदुडू हालचाल करत आहेत. तसंच या व्हिडीओमध्ये त्यांचा नातू आनंदाने टाळ्यादेखील वाजवत आहे. त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओला प्रेक्षकांनी लाईक्स व कमेंट्सद्वारे चांगलाच प्रतिसाद दिला आहे.
आणखी वाचा – Tula Shikvin Changlach Dhada : एकीकडे चारुलताचे लग्न, दुसरीकडे अक्षरा संकटात, अधिपती वाचवणार का?
दरम्यान, अरुण कदम यांची लेक सुकन्या हिने गोंडस बाळाला जन्म दिला. सुकन्याला ऑगस्ट महिन्यात पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. आपल्या लाडक्या लेकाचं नाव त्यांनी अथांग असं ठेवलं आहे. अरुण कदम अनेकदा नातवाबरोबरचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवरुन नातवाचा व्हिडीओ शेअर केला आहे. आजोबा-नातवाचा हा खास बॉण्ड त्यांच्या चाहत्यांना नेहमीच भावतो. अशातच त्यांचा हा व्हिडीओही चाहत्यांच्या पसंतीस पडत आहे.