बालदिन दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचे मुलांवर खूप प्रेम होते, मुलेही नेहरूजींना ‘चाचा नेहरू’ म्हणत असत. चाचा नेहरूंचे मुलांवरील प्रेम पाहून १४ नोव्हेंबर हा त्यांचा जन्म दिवस बालदिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशातच आज सर्वत्र बालदिन मपथ्या उत्साहात साजरा होत आहे. पण एका दिवसासाठी या दिवसाचं साजरीकरण मर्यादित न ठेवता एका स्त्रीने स्वतःचं संपूर्ण आयुष्य काही मुलांसाठी समर्पित केलं आहे. (Swati Mukherji Children’s Day Special)
ही ‘स्त्री’ म्हणजे स्वाती मुखर्जी. स्वाती मुखर्जी या रस्त्यावरच्या बेघर, अनाथ व बिकट परिस्थितीतील मुलांसाठी स्वत: आई बनल्या. स्वाती मुखर्जी या वात्सल्य संस्थेअंतर्गत काम करतात आणि ही संस्था आशा आशा मुलांसाठी काम करते. जे अनाथ आहेत, ज्यांना स्वत:च राहतं आणि हक्काचं घर नाही. तसंच ज्यांची परिस्थिती अगदीच बिकट आहे. ‘मज्जा पिंक’ने बालदिनाचे औचित्य साधत स्वाती यांच्याशी खास संवाद साधला. यादरम्यान, त्यांना स्वतःच्या कुटुंबाचं आणि स्वतःच्या आयुष्यात अनेक बलिदान द्यावी लागली. त्यांच्या या सर्व प्रवासाबद्दल सांगितले.
आणखी वाचा – Video : नातवाबरोबर स्वतःही लहान झाले अरुण कदम, दोघांचा एकत्रित भन्नाट डान्स, क्युट व्हिडीओ तुफान व्हायरल
या सामाजिक कार्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या गुरुकडून मिळाली असल्याचे त्यांनी सांगितलं. तसंच पुढे त्यांनी असं म्हटलं की, ‘वात्सल्य’मध्ये अशी अनेक मुलं शिकत आहेत आणि आमचा उद्देश हा आहे की त्यांनी त्यांच्या खऱ्या आई-वडिलांकडे जावं. हे करताना आम्हाला काही अडचणी येतात, पण आम्हाला त्यांच्याशी अधिक लगाव लागू न देणे हे करावे लागते. ‘वास्तल्य’ सोडून जाताना अनेक मुलांना त्रास होतो, ते रडतातही. पण आम्हाला कठोर व्हावं लागतं. आज वात्सल्यमधून अनेकजण मुलं शिकून मोठी झाली आहेत आणि मोठ्या हुद्द्यावर आहेत. त्यांचे फोन येतात तर आम्हाला कुठे तरी आमच्या जन्माचे सार्थक झाल्याचे वाटतं”.
आणखी वाचा – तेल न वापरताच जेवण बनवतात अशोक शिंदे, डाळ, भाजी, बुर्जीसाठी तर पाण्याचा करतात वापर, म्हणाले, “बटाटा वडाही…”
स्वाती यांनी त्यांच्या या समाजिक कार्यासाठी लग्न न केल्याचेही सांगितलं. याबद्दल त्या असं म्हणाल्या की, “या कार्यासाठी मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय मी माझ्या संमतीने घेतला आहे. माझे वडील डॉक्टर होते आणि माझ्या आईला झाडे लावण्याची आवड होती. माझ्या पालकांनी मला कधी आग्रह नाही केला. तेव्हा माझ्याकडे दोन पर्याय होते, यापैकी एक म्हणजे मी लग्न करुन घरी बसणे आणि दुसरं म्हणजे या लहान मुलांना सांभाळणे. मग मी दुसरं पर्याय निवडला. हा निर्णय माझ्यासाठी कठीण होता पण मी या निर्णयाने आनंदी आहे”.