‘झी मराठी’ वाहिनीवर नव्यानेच सुरू झालेली ‘पारू’ ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या मालिकेच्या कथानकाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. पारूचा साधेपणा अनेकांना आवडतोय. यामध्ये अभिनेत्री शरयू सोनावणे, मुग्धा कर्णिक व प्रसाद जवादे मुख्य भूमिकेत आहेत. मालिकेचे शूटिंग हे सध्या सातारामध्ये सुरु आहे. अशातच नुकतंच या मालिकेच्या सेटची खास सफर करण्यासाठी मराठी मीडियाला आमंत्रण देण्यात आले होते.
यावेळी आदित्य किर्लोस्कर म्हणजेच अभिनेता प्रसाद जवादेने इट्स मज्जाबरोवर खास संवाद साधला. यावेळी त्याने शूटिंगनिमित्त सातारामध्ये आहे. त्यामुळे साताराच्या काही खास गोष्टी शेअर केल्या आहेत. यावेळी त्याने असं म्हटलं की, “साताराची लोकं खूप चांगली असून इकडची सगळी माणसं खूप मदतनीस आहेत. मी इतर शहराचं नाव घेत नाही. पण तिथे एखाद्याला रस्ता विचारला तर ते सहज सांगत नाहीत. पण साताराच्या लोक याबाबत लगेच मदत करतात आणि हे माझ्यासाठी आश्चर्यचकित करणारी गोष्ट आहे.”
यापुढे त्याने असं म्हटलं की, “इथे मला खूप ठिकाणी अप्रतिम जेवायला मिळत आहे. त्यामुळे डाएटकडे माझं दुर्लक्ष होत आहे. पण इथला परिसर खूप छान आहे. इथली हवा थंड व फ्रेश आहे. मुख्यत: रात्रीचे इथे आकाशात तारे दिसतात, जे मुंबई-पुण्यात दिसत नाहीत. तर आम्ही रात्री शूटिंगनंतर सेटवर बसून रात्रीचे चंद्र, तारे बघत असतो आणि त्यामुळे पॅकअपनंतर खूप शांत वाटतं. पण सध्या मी अमृतापासून लांब आहे, त्यामुळे या एका कारणाशिवाय मला सातारा आवडत आहे.”
दरम्यान, सध्या मालिकेत पारूच्या लग्नाची घाई सुरु असलेली पाहायला मिळत आहे. तर एकीकडे प्रीतम व दिशाच्या साखरपुड्याची लगबग सुरु आहे. पारूसाठी आलेलं स्थळ हे बोगस असतं, त्या मुलाला दिशाने पाठवलेलं असतं, आता दिशाने टाकलेल्या या डावात पारू अडकणार का?, की पारूची यातून सुटका होणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरणार आहे.