शाहरुख खानच्या ‘परदेस’चित्रपटातील गंगा म्हंटल की डोळ्यासमोर लगेचच महिमा चौधरीचा चेहरा समोर येतो. ९०च्या दशकामध्ये महिमा बॉलिवूडमधील यशस्वी अभिनेत्रींपैकी एक होती. महिमाने तिच्या करिअरमध्ये खूप कमी चित्रपटांमध्ये काम केले आहे. पण त्यातील तिच्या सर्व भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. करिअरमध्ये यश येत असताना तिच्या नशिबाने मात्र तिला साथ दिली नाही. भयानक अपघात ते कर्करोगाशी यशस्वी लढाई हा संपूर्ण प्रवास प्रेरणादायी ठरला आहे. आज आपण तिच्या प्रवासाबद्दल जाणून घेणार आहोत. (mahima chaudhary tragic life )
महिमाने दिग्गज चित्रपटनिर्माते सुभाष घई यांच्या ‘परदेस’ या सुपरहिट चित्रपटातून अभिनय विश्वात पदार्पण केले. तिच्याबरोबर या चित्रपटामध्ये शाहरुख खान दिसून आला होता. या चित्रपटामधून ती रातोरात प्रसिद्ध झाली. त्यानंतर ती ‘दिल है तुम्हारा’, ‘दाग’, ‘धडकन’, ‘दिल क्या करे’ या सुपरहिट चित्रपटांमधून दिसून आली. तिचे करिअर चांगले सुरु असतानाच तिच्या आयुष्यात एक भयानक घटना घडली. एका प्रवासात असताना तिचा भयंकर अपघात झाला आणि त्यामध्ये तिचा चेहरा पूर्णतः खराब झाला. यामुळे ती तिचा पूर्ण आत्मविश्वास निघून गेला होता.
याबद्दल एका मुलाखतीमध्ये तिने तिचा अनुभव शेअर केला होता. ती म्हणाली की, “या अपघातामुळे तिचे पूर्ण आयुष्य बदलून गेलं. चित्रकरणासाठी बाहेर जात असताना चुकीच्या बाजूने दुधाची गाडी येत होती. त्याचवेळी गाडीने धडक दिली. त्यावेळी मला असं वाटलं की माझा मृत्यू झाला. त्यावेळी रुग्णालयात मला कोणीही घेऊन गेलं नाही. रुग्णालयात पोहोचल्यानंतर माझी आई व अजय आले. मी त्यावेळी माझा चेहरा आरशात पाहिला. तो चेहरा खूप भयानक होता. जेव्हा माझ्यावर शस्त्रक्रिया झाली तेव्हा तब्बल ६७ काचेचे तुकडे काढले होते”. या अपघातानंतर ती सर्वांपासून दूर गेली.
या अपघातानंतर ती पूर्णतः कोलमडली होती. त्यानंतर २०२१-२०२२ साली तिच्या बाबतीत पुन्हा एकदा भयंकर प्रसंग घडला. त्यावेळी तिला स्तनांचा कर्करोग झाला होता. याबाबत अभिनेते अनुपम खेर यांनी पोस्ट करुन सांगितले होते. यावर उपचार करणे तिच्यासाठी खूप कठीण होते. पण उपचार घेऊन ती या आजारातूनही लवकर बरी झाली. या दरम्यान तिचा दोन वेळा गर्भपातही झाला होता.
आधी भयंकर अपघात, त्यानंतर कर्करोगाशी सामना,गर्भपात याला सामोरे गेल्यानंतर तिच्या आयुष्यात अजून एक प्रसंग घडला. २००६ साली तिने बंगाली व्यावसायिक बॉबी मुखर्जी बरोबर लग्न केले होते. पण काह कारणास्तव २०१३ साली तिचा घटस्फोटही झाला. तिला एक मुलगी असून ती एकटी आपल्या मुलीचा सांभाळ करत आहे.