चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च मानाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा काल दिल्लीत झाली. ज्यामध्ये अनेक बॉलीवूड, दाक्षिणात्य व अन्य भाषेतील चित्रपटांचा समावेश आहे. बॉलीवूडबद्दल बोलायचे झाल्यास, ‘गंगुबाई काठियावाडी’, ‘सरदार उधम’, ‘मिमी’ या चित्रपटांचा बोलबाला राहिला आहे. प्रसिद्ध अभिनेते पंकज त्रिपाठी यांना ‘मिमी’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. (Pankaj Tripathi)
गेल्या २१ ऑगस्ट रोजी अभिनेते पंकज त्रिपाठी यांच्या वडिलांचे निधन झाले होते. त्यांच्या जाण्याने पंकज त्रिपाठी व त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे. वडिलांच्या अंतिम विधीसाठी पंकज त्रिपाठी गोपाळगंजमधील बरौली येथील मूळगावी पोहोचले आहेत. दरम्यान, त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचे जाहीर होताच पंकज त्रिपाठी भावुक झाले. पंकज त्रिपाठी म्हणाले, “दुर्दैवाने, हा माझ्यासाठी खुप दुःखाचा काळ आहे. आज जर बाबूजी (वडील) माझ्यासोबत असते, तर त्यांना खूपच आनंद झाला असता. जेव्हा मला पहिल्यांदा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला आणि अभिमान वाटला होता.”
हे देखील वाचा – राखी सावंतचं इन्स्टाग्राम अकाऊंट हॅक, पोलिसांत तक्रार दाखल, म्हणाली, “ते माझा पाठलाग करतात आणि…”
“यावर्षीचा हा पुरस्कार मी वडिलांना समर्पित करत आहे. मी आज जे काही आहे, ते केवळ त्यांच्यामुळे आहे. मी यासाठी चित्रपटाच्या टीमचे आभार मानतो.”, असे म्हणत त्यांनी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीसाठी क्रिती सेननचे अभिनंदन केले आहे. क्रिती सेननची मुख्य भूमिका असलेली ‘मिमी’ चित्रपटात तिच्यासह पंकज त्रिपाठी व सई ताम्हणकर महत्वाच्या भूमिकेत होते. चित्रपटाची कथा समृद्धी पोरे यांची असून दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. (Pankaj Tripathi on National Award)