मंगळवार, जून 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आम्हाला अशी वागणूक…”, काम करुनही पैसे न दिल्याने गौतमी देशपांडे भडकली, म्हणाली, “लोक असं वागतात तेव्हा…”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 25, 2023 | 5:44 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Gautami Deshpande shared screenshot

“आम्हाला अशी वागणूक…”, काम करुनही पैसे न दिल्याने गौतमी देशपांडे भडकली, म्हणाली, “लोक असं वागतात तेव्हा…”

कलाक्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळींना सहज यश मिळणं अगदी अवघड असतं. तासन् तास काम केल्यानंतर कलाकारांनी केलेली मेहनत पडद्यावर दिसते. पण अनेक कलाकारांना अधिकाधिक काम करुनही आपल्या कामाचा मोबदला वेळीच मिळत नाही. काही कलाकार याबाबत उघडपणे बोलतानाही दिसतात. आता असाच प्रकार अभिनेत्री गौतमी देशपांडेबरोबर घडला आहे. गौतमीने इन्स्टाग्रामद्वारे स्टोरी शेअर करत याबाबत सांगितलं. (Gautami Deshpande shared screenshot)

गौतमीने इन्स्टाग्रामद्वारे मॅसेजचा स्क्रिनशॉट शेअर केला. यामध्ये तिने समोरच्या व्यक्तीला “पैसे ट्रान्सफर केले का?” असा मॅसेज केला. यावर “थांब मी चेक करते” असं उत्तर देण्यात आलं. पण दोन दिवस काहीच रिप्लाय नसल्यामुळे तिने संबंधित व्यक्तीला पुन्हा मॅसेज केला. दरम्यान तिने मॅसेज करत तिचा संताप व्यक्त केला. शिवाय कलाकारांना पैश्यांसाठी रखडवलं जातं याविषयी भाष्य केलं.

आणखी वाचा – ५७व्या वर्षी दुसरं लग्न केलेल्या आशिष विद्यार्थी यांच्या पहिल्या पत्नीची प्रतिक्रिया, म्हणाल्या, “पुरुषाची चूक…”

ती म्हणाली, “अनेकदा मी तुम्हाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. एखाद्या कलाकाराला या गोष्टीसाठी एवढा वेळ पाठपुरावा करावा लागतो ही गोष्ट न स्वीकारण्यासारखी आहे. सोमवारपर्यंत माझे पैसे मला ट्रान्सफर करा”. तिच्या या मॅसेजवरही समोरच्या व्यक्तीचा रिप्लाय येत नाही. पुन्हा ती मॅसेज करते की, “तुम्ही रिप्लायसुद्ध करु शकत नाही. तुम्हाला जर या मॅसेजला उत्तर देत नसाल तर मी हा संपूर्ण प्रकार इन्स्टाग्रामद्वारे उघडकीस आणेन”.

आणखी वाचा – गौरव मोरेच्या हाती मोठा मराठी चित्रपट, प्रसाद ओकबरोबर काम करताना दिसणार, म्हणाला, “लवकरच…”

स्क्रिनशॉट शेअर केल्यानंतर गौतमीने पैसे न देणाऱ्या लोकांना चांगलंच सुनावलं. ती म्हणाली, “जेव्हा पैशांचा प्रश्न येतो तेव्हा लोक असं वागतात. आता याक्षणी मी खूप निराश आहे. आम्ही काम करतो पण त्याबदल्यामध्ये आम्हाला अशी वागणूक मिळते. स्वतःच्या पैशांसाठी आम्हाला कित्येकदा पाठी लागून पाठपुरावा करावा लागतो”. फक्त गौतमीच नव्हे तर याआधी बऱ्याच कलाकारांबरोबर हा प्रकार घडला आहे.

Tags: deshpande shared screenshotentertainmentgautami deshpandegautami deshpande news
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Jennifer Winget Wedding
Entertainment

घटस्फोटाच्या १२ वर्षांनी टीव्ही अभिनेत्रीची लगीनघाई, सिंगापूरच्या उद्योगपतीसह बांधणार लग्नगाठ

जून 8, 2026 | 2:02 pm
vivek dahiya divyanka tripathi kids
Entertainment

लग्नाच्या १० वर्षांनी जुळ्या मुलांना जन्म दिल्यानंतर केली त्यांची पूजा, दोन्ही आजी-आजोबाही उपस्थित, बाळाची झलक

जून 8, 2026 | 12:00 pm
pepsi sharma passes away
Entertainment

हरियाणवी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध कलाकार काळाच्या पडद्याआड, अचानक छातीत दुखू लागलं आणि…

जून 8, 2026 | 10:02 am
Communication In Relationships
Lifestyle

लग्नाच्या किती वर्षांनी बहुतेक घटस्फोट होतात?, नात्यात दुरावा निर्माण होण्याची ही आहेत कारणं, जाणून घ्या…

जून 7, 2026 | 12:05 pm
Next Post
Hema Malini On Sunny Deol And Bobby Deol

"कुटुंब वेगळं झालंय असं…", सनी व बॉबी देओलबरोबर असलेल्या नात्याबाबत हेमा मालिनींचा खुलासा, म्हणाल्या, "काही कारणास्तव…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.