शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Paaru Marathi Serial : पारू-आदित्यचं नवरा-बायको असल्याचं नाटक येणार का समोर?, आलेलं हे संकट प्रिया सांभाळून घेणार का?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 5, 2024 | 10:29 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Serial Update todays episode

पारू-आदित्यचा खरा चेहरा येणार का प्रियाच्या वडिलांसमोर?

‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे सगळेच जण प्रियाच्या घरी असतात. तेव्हा प्रियाचे वडील आदित्यला घेऊन शेतात जातात. त्यावेळेला आदित्य कडून काही चुका होतात तेव्हा प्रियाचे बाबा सांगतात की, या चुका तुझ्याकडून होत आहेत म्हणजे तू नक्की शेतकरीच आहेस ना?, आता मला तुला पहिल्यापासून सगळं शिकवावं लागेल. इथे आपण खड्डे खोदायला घेऊया आणि काही फळ झाड लावूया. विशेष करुन आंब्याची झाड लावूया, कारण तिला कैरी खूप आवडायची. यावर आदित्य कोणाला असं म्हणतो तेव्हा प्रियाचे बाबा काहीच बोलत नाहीत.  (Paaru Serial Update)

आदित्यवर खोदकामाची जबाबदारी सोडून ते तिथून निघून जातात. तर इकडे प्रीतम सकाळपासून दुपारपर्यंत गोठा साफ करत असतो आणि गाईचं त्याला दूध काढायचं असतं तेव्हा त्याला प्रिया मदत करते. प्रिया त्याला गाईचे दूध कसे काढायचे हे शिकवते. हे पाहून प्रीतम खूप खुश होतो. त्यानंतर घरात सगळेजण जेवत असतात तेव्हा पारूने बनवलेलं जेवण जेवून प्रियाच्या वडिलांना अहिल्यादेवींची आठवण येते. अहिल्यादेवी म्हणजेच त्यांच्या बहिणीच्या हातची चव अशीच काहीशी आहे असं ते मनातल्या मनात म्हणतात. आज पुन्हा एकदा तिची आठवण आली असं म्हणत ते जेवू लागतात. मात्र घरातील इतर कोणीच काही बोलत नाही.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा खेळला जाणार कॅप्टन्सीचा टास्क, कोण होणार आता नवीन कॅप्टन, प्रोमो समोर

त्यानंतर पारू आदित्यला जेवण घेऊन शेतावर जाते. दोघही मिळून एकत्र बसून जेवण जेवत असतात, तर इकडे आबासाहेबांनी आठवण काढताच अहिल्या देवींना ठसका लागतो. तेव्हा श्रीकांत सांगतात की, तुझ्या कोणत्यातरी जवळच्या नातेवाईकांनी तुझी आठवण काढली असावी. तर इकडे दिशावर आदित्यच्या कामाची जबाबदारी असते त्यामुळे ती सर्वांवर वर्चस्व गाजवत काम करत असते. आता मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, आदित्य व पारू झोपायला जातात.

आणखी वाचा – दोन टीशर्ट, तुटलेली चप्पल घेऊन Bigg Boss मध्ये आला होता सूरज, आता त्याला कपडे नक्की कोण देतं?

तेव्हा बाहेर कुणीच नाही असं म्हणत आदित्य बाहेर झोपायला जातो हे मावशी पाहतात. आणि येऊन आबासाहेब व प्रियाकडे तक्रार करतात. की आपल्याकडे त्या आलेल्या जोडप्यावर काहीतरी संशय येत आहे. ते आपल्यापासून काहीतरी लपवून ठेवत आहेत. आता पारू व आदित्यच्या लग्नाचं खोटं सत्य सर्वांसमोर येईल का हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: marathi serialpaaru marathi seialPaaru Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
muzammil Ibrahim on pooja bhatt
Entertainment

“कलाकार कुत्र्यांसारखे असतात, शिवीगाळी करुन…”, पूजा भट्टवर सुप्रसिद्ध अभिनेत्याचे गंभीर आरोप, घाणेरडी वागणूक दिली अन्…

जून 6, 2025 | 5:00 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 nikki and abhijeet talk

Bigg Boss Marathi : अभिजीत विरोधात प्लॅनिंग करुन आता त्याच्याकडेच गेली निक्की, एकत्र बसलेले पाहून अरबाजला राग अनावर अन्…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.