Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. एकापेक्षा एक असलेले हे स्पर्धक स्वतःला सिद्ध करण्यासाठी ‘बिग बॉस’च्या घरात धुमाकूळ घालताना दिसत आहेत. या स्पर्धकांपैकी नेहमीच चर्चेत राहणारी स्पर्धक म्हणजे निक्की तांबोळी. हिंदी ‘बिग बॉस’ मधून आलेल्या निक्कीने ‘बिग बॉस मराठी’च्या घरात धुमाकूळ घातला. सर्वत्र निक्की तांबोळीच्या वागण्या बोलण्याची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. अनेकांना तिचं वागणं बोलणं दिसतंय तर काहीजण निक्कीला पाठिंबा देताना दिसत आहे. अनेक कलाकार मंडळींनी ही निक्कीला पाठिंबा दर्शविला.
‘बिग बॉस’च्या घरात आल्यावर निक्की व अरबाजमध्ये मैत्री पाहायला मिळाली. मात्र काही काळासाठी ही मैत्री तुटली होती. आता पुन्हा एकदा अरबाज व निक्की एकत्र आलेले पाहायला मिळत आहेत. ‘बिग बॉस’च्या घरात टास्कदरम्यान निक्कीला योग्य तो न्याय मिळाला नाही म्हणून तिने घरात कोणतही काम करणार नाही असा निश्चय केला. घरातील सर्व सदस्यांनी तिला समजावून सांगितल्यानंतरही निक्की तिच्या मतावर ठाम राहते आणि त्यावेळेला निक्की घरातील काम करणार नसल्याचं स्पष्ट करते. तर इकडे जान्हवीही मी बनवलेले जेवण मिळणार नाही असं ठरवते.
जान्हवीने सगळ्यांसमोर स्पष्ट केले की, मी बनवलेले जेवण निक्कीला देणार नाही. घरात राशन आहे ते तिने घेऊन स्वतः जेवण बनवून खावे. यावरुन निक्की व जान्हवीमध्ये जोरदार वाद झालेला पाहायला मिळाला. जान्हवीने घरातील अकरा सदस्यांचे जेवण केलं मात्र बाराव्या सदस्याचे जेवण केलं नाही. यावरुन निक्की जान्हवीला सुनावते. त्यानंतर शेवटी निक्की स्वतः उठून स्वतःच्या हाताने जेवण करते आणि ती जेवते. यावेळी या वादात निक्कीसाठी अभिजीतने काहीच सपोर्ट केला नाही. त्याने यावर मत मंडळ नाही म्हणून निक्की अभिजीतची चांगली शाळा घेते.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा खेळला जाणार कॅप्टन्सीचा टास्क, कोण होणार आता नवीन कॅप्टन, प्रोमो समोर
यावेळी तू काहीतरी बोलायला अपेक्षित होतं पण तू तसं केलं नाही हे फार चुकीचं केलं असं निक्की म्हणते. निक्की व अभिजीत बोलत असताना अरबाज त्यांच्याकडे रागाने पाहतो. अगदी पहिल्या दिवसापासून अरबाजला निक्की व अभिजीत यांची मैत्री पटत नव्हती. आता निक्की अभिजीतवरील राग टास्कमध्ये काढणार का?, हे पाहणं रंजक ठरेल.