‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे सगळेच जण प्रियाच्या घरी असतात. तेव्हा प्रियाचे वडील आदित्यला घेऊन शेतात जातात. त्यावेळेला आदित्य कडून काही चुका होतात तेव्हा प्रियाचे बाबा सांगतात की, या चुका तुझ्याकडून होत आहेत म्हणजे तू नक्की शेतकरीच आहेस ना?, आता मला तुला पहिल्यापासून सगळं शिकवावं लागेल. इथे आपण खड्डे खोदायला घेऊया आणि काही फळ झाड लावूया. विशेष करुन आंब्याची झाड लावूया, कारण तिला कैरी खूप आवडायची. यावर आदित्य कोणाला असं म्हणतो तेव्हा प्रियाचे बाबा काहीच बोलत नाहीत. (Paaru Serial Update)
आदित्यवर खोदकामाची जबाबदारी सोडून ते तिथून निघून जातात. तर इकडे प्रीतम सकाळपासून दुपारपर्यंत गोठा साफ करत असतो आणि गाईचं त्याला दूध काढायचं असतं तेव्हा त्याला प्रिया मदत करते. प्रिया त्याला गाईचे दूध कसे काढायचे हे शिकवते. हे पाहून प्रीतम खूप खुश होतो. त्यानंतर घरात सगळेजण जेवत असतात तेव्हा पारूने बनवलेलं जेवण जेवून प्रियाच्या वडिलांना अहिल्यादेवींची आठवण येते. अहिल्यादेवी म्हणजेच त्यांच्या बहिणीच्या हातची चव अशीच काहीशी आहे असं ते मनातल्या मनात म्हणतात. आज पुन्हा एकदा तिची आठवण आली असं म्हणत ते जेवू लागतात. मात्र घरातील इतर कोणीच काही बोलत नाही.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi च्या घरात पुन्हा खेळला जाणार कॅप्टन्सीचा टास्क, कोण होणार आता नवीन कॅप्टन, प्रोमो समोर
त्यानंतर पारू आदित्यला जेवण घेऊन शेतावर जाते. दोघही मिळून एकत्र बसून जेवण जेवत असतात, तर इकडे आबासाहेबांनी आठवण काढताच अहिल्या देवींना ठसका लागतो. तेव्हा श्रीकांत सांगतात की, तुझ्या कोणत्यातरी जवळच्या नातेवाईकांनी तुझी आठवण काढली असावी. तर इकडे दिशावर आदित्यच्या कामाची जबाबदारी असते त्यामुळे ती सर्वांवर वर्चस्व गाजवत काम करत असते. आता मालिकेच्या पुढील भागात असे पाहायला मिळणार आहे की, आदित्य व पारू झोपायला जातात.
आणखी वाचा – दोन टीशर्ट, तुटलेली चप्पल घेऊन Bigg Boss मध्ये आला होता सूरज, आता त्याला कपडे नक्की कोण देतं?
तेव्हा बाहेर कुणीच नाही असं म्हणत आदित्य बाहेर झोपायला जातो हे मावशी पाहतात. आणि येऊन आबासाहेब व प्रियाकडे तक्रार करतात. की आपल्याकडे त्या आलेल्या जोडप्यावर काहीतरी संशय येत आहे. ते आपल्यापासून काहीतरी लपवून ठेवत आहेत. आता पारू व आदित्यच्या लग्नाचं खोटं सत्य सर्वांसमोर येईल का हे पाहणं रंजक ठरेल.