‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे प्रियाच्या घरी आदित्य, पारू व प्रीतम तिच्या वडिलांना आणि भावाला खुश करण्यासाठी आलेले असतात. त्यांची मन जिंकून प्रियाचा हात मागायचा असं त्यांनी ठरवलेलं असतं. त्यामुळे प्रीतम, आदित्य व पारू बोलत असतात. तेव्हा पारू सांगते की, काही करुन आपल्याला लवकरात लवकर हे सगळं करावं लागेल. लग्नाची तारीख सुद्धा जवळ येत आहे. त्यामुळे काही करुन प्रियाला मागणी घालून आपल्याला त्यांना अहिल्यादेवींची भेट ही घडवून आणावी लागेल. हे ऐकल्यावर प्रीतम म्हणतो हो मी सुद्धा प्रयत्न करतो आहे. तर आदित्य सांगतो मी सुद्धा प्रयत्न करतोय. (Paaru Serial Update)
आदित्यचे हात बघून प्रीतमला फार वाईट वाटतं कारण आदित्यने शेतात एका शेतकऱ्यासारखा काम केलेलं असतं. त्यामुळे त्याच्या हाताला फोड आलेला असतो. प्रीतम सांगतो की, तू एसीमध्ये बसून काम करणारा माणूस आहेस आणि एसीमध्ये बसून एक करोडोंच्या फाईलवर एक एक सह्या तुझ्यासाठी थांबलेल्या असतात, तु हे काम करतो ते मला अजिबात पटत नाहीये. चल आपण जाऊया मुंबईला मात्र आदित्य सांगतो की, तुझं आणि प्रियाचं प्रेम हे खरं आहे. ते मी तुम्हाला मिळून देणारच म्हणून मला हे करावंच लागेल. त्यानंतर पहिल्या दिवशी सगळ्यांचाच काम करताना गोंधळ होतो. मात्र दुसऱ्या दिवशी प्रीतम आदित्य त्यांचं काम अगदी योग्यरीत्या पार पाडतात. प्रीतमने गाईचं काढलेलं दूध पिऊन प्रियाचा भाऊ सुद्धा खूप खुश होतो. तर इकडे आदित्य शेतात काम करत असतो. तर पारू सुद्धा घरातली काम करुन त्या मावशींचं मन जिंकते.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी पारू घराबाहेर रांगोळी काढत बसलेली असते तेव्हा तिला रांगोळी काढताना पाहून आबासाहेबांना खूप चांगलं वाटतं. आणि ते पारूच्या डोक्यावर हात ठेवून तिला आशीर्वाद देतात. तर इकडे किर्लोस्कर बंगल्यात दिशाकडे आदित्यच्या कामाची जबाबदारी आल्यानं दिशा हवा तो अतिरेक करताना दिसते. दिशानं कामावरील वयस्कर लोकांना काढून टाकलं असल्याचंही पाहायला मिळतं. मात्र मोहन तिची यावर समजूत घालतो. दिशा सांगते की, तुम्ही यात नाही पडलेलच बरं असं म्हणत मोहनलाही ती शांत करते आणि त्या माणसांना कामावरून काढून टाकते. तर इकडे पारू, आदित्य, प्रीतम हळूहळू प्रियाच्या घरातल्यांची मन जिंकताना दिसतात. तर प्रियाचे बाबा प्रियालाही या मंडळींबद्दल विचारतात तेव्हा प्रिया सुद्धा त्यांचं कौतुक करते आणि ही निखळ मनाची लोकं आहेत असं सांगते.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi चा चौथा कॅप्टन बनला गोलीगत सूरज चव्हाण, सलग तीन आठवडे नॉमिनेटेड असूनही मिळवले कॅप्टन पद
हे ऐकल्यावर आबासाहेबांना आणखीनच दिलासा येतो. तर इकडे प्रीतम प्रियाच्या भावाला इम्प्रेस करायला म्हणून कुस्ती खेळणाऱ्या ठिकाणी जातो आणि सांगतो की, मला सुद्धा कुस्ती खेळायची आहे. आता प्रियाचा भाऊ प्रीतमला कुस्ती शिकवणार का?, हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल. तसेच मालिकेच्या पुढील भागांमध्ये पारू, आदित्य हे कशाप्रकारे त्यांची मन जिंकतील आणि प्रिया प्रीतमचं लग्न ठरवतील हे पाहणं रंजक ठरेल.