टीव्ही अभिनेत्री हिना खान सध्या तिच्या आयुष्यातील सर्वात कठीण प्रसंगातून जात आहे. अभिनेत्री सध्या ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. या आजारातून बरे होण्यासाठी तिच्यावर उपचार सुरु आहेत. तिची पाचवी केमोथेरपी सुरु आहे, ज्यामुळे तिला आजारपणाच्या वेदना आणि त्याचे दुष्परिणाम भोगावे लागत आहेत. याबाबत आता अभिनेत्रीने एका नवीन पोस्टमध्ये भाष्य केलं आहे. हिना खानने इन्स्टाग्राम अकाउंटवर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. (Hina Khan Health Update)
या पोस्टमध्ये तिने, ‘म्यूकोसिटिस हा केमोथेरपीचा आणखी एक दुष्परिणाम आहे. यासाठी मी डॉक्टरांच्या सल्ल्याचे पालन करत आहे. परंतु तुमच्यापैकी कोणी यातून गेले असेल किंवा याबद्दल माहिती असेल तर कृपया आम्हाला उपयुक्त उपचार सांगा”. वयाच्या ३६ व्या वर्षी हिना खानला ब्रेस्ट कॅन्सरचा सामना करावा लागत आहे. हिनाने तिच्या वेदना शेअर करत पोस्टमध्ये असं म्हटलं की, “जेव्हा तुम्हाला काहीही खायला मिळत नाही तेव्हा ते अधिक कठीण होते. जर कोणी या परिस्थितीबाबत सल्ला दिला तर खूप मदत होईल. ‘कृपया सुचवा'”, असे कॅप्शन देत तिने विनवणी केली आहे.
हिनाच्या पोस्टवर चाहते खूप कमेंट करत आहेत. प्रत्येकजण आपापल्या अनुभवातून तिला उपचार सांगत आहेत. एकाने चाहत्याने या पोस्टवर कमेंट करत असे लिहिले आहे की, “सॉफ्ट फूड आणि प्रोटीनयुक्त अन्न खा”. तर काही लोकांनी माउथ वॉश वापरा असेही सांगितले. अभिनेत्रींच्या प्रकृतीसाठी सर्वजण प्रार्थना करत आहेत.
आणखी वाचा – Bigg Boss Marathi चा चौथा कॅप्टन बनला गोलीगत सूरज चव्हाण, सलग तीन आठवडे नॉमिनेटेड असूनही मिळवले कॅप्टन पद
हिना खानने २८ जून २०२४ रोजी खुलासा केला होता की, ती स्टेज ३ ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज देत आहे. तेव्हापासून आत्तापर्यंत ती सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांना आरोग्याबाबतचे अपडेट देत असते. अलीकडेच, तिने एक व्हिडीओ शेअर केला होता की, तिने आपले केस कापले आहेत, कारण उपचारादरम्यान जवळजवळ सर्व केस गळतात. अशा परिस्थितीत स्वत:वर मानसिक नियंत्रण ठेवण्यासाठी तिने त्या आधीच केस कापले.