बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

किर्लोस्कर बंगल्यात सर्वांना येतेय पारूची आठवण, तर दामिनी-दिशाची नवी चाल, अहिल्यादेवींच्या मनात पारूबाबत विष कालावलं अन्…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 10, 2024 | 10:24 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Serial Update

किर्लोस्कर बंगल्यात सर्वांना येतेय पारूची आठवण, तर दामिनी-दिशाची नवी चाल, अहिल्यादेवींच्या मनात पारूबाबत विष कालावलं अन्…

‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, किर्लोस्कर घरात सगळेजण जेवायला बसलेले असतात तेव्हा प्रीतमला ते जेवण आवडत नाही आणि तो म्हणतो की, या जेवणाला काही टेस्ट नाही आहे आणि हे रोजच्यासारखं जेवण नाही आहे. यावर अहिल्यादेवी त्याच्यावर रागावतात आणि सांगतात की, ही एका शेतकऱ्याची मेहनत आहे. ताटात आलेलं अन्न पूर्ण खायचं हे माझ्या घरात चालणार नाही, असं म्हणून त्याला चांगलीच अद्दल शिकवतात आणि तो जेवू लागतो. त्यानंतर खोलीत प्रीतम बसलेला असतो तेव्हा आदित्य प्रीतमच्या खोलीत येतो तेव्हा आदित्य प्रीतमची विचारपूस करतो आणि सांगतो की, तू असं का वागलास त्यात ते जेवण सावित्री आत्याने बनवलं होतं तिला किती वाईट वाटलं असेल. (Paaru Serial Update)

यावर प्रीतम सांगतो पण पारूचं काही चुकलं नाही हे कोणी समजूनच घेत नाही आहे आणि आईसुद्धा पारुला नीचा दाखवण्यासाठी असं वागत आहे. यावर आदित्य प्रीतमला शांत बसायला सांगतो. तर इकडे पारूसुद्धा जेवलेली नसते तेव्हा गनी पारूला ओरडतो आणि जेवायला सांगतो आणि स्वतः तिला जेवायला भरवतो. त्यानंतर इकडे आदित्यचा पायात अचानक कळा येऊ लागतात तेव्हा प्रीतम अहिल्यादेवींना सांगतो आणि अहिल्यादेवी दुसऱ्या दिवशी डॉक्टरला बोलवतात. डॉक्टर जेव्हा आदित्यच्या पायाला पायावर उपचार करण्यासाठी येतात तेव्हा ते आदित्यच्या पायाला लावलेला लेप पाहून म्हणतात, हा लेख कोणी लावला आहे?,

आणखी वाचा – एकीकडे रुपाली घेत आहे घरातल्यांची काळजी तर दुसरीकडे इंद्राणीकडून श्लोकाचे वाचन, अस्तिकट्टयार मिळणार का?

यावर दामिनी पुढे पुढे करत पारूने लावला आहे, हे चुकीचं असणार नक्की, तिला आम्ही सांगत होतो की, असं काही करु नको. अघोरी उपाय करु नकोस, डॉक्टरांना बोलावून घे, यावर डॉक्टर सांगतात की, असं काही नाही आहे तुम्ही तिला कौतुक करायला हवं असेल तर बोलवू शकता कारण हा लेप तिने उत्तम आणि योग्य प्रकारे लावला आहे. त्यामुळेच कदाचित आदित्य सरांना बरं वाटत असावं हे ऐकल्यावर मात्र दामिनीचा डावच तिच्यावर उलटतो. यावर दामिनी त्यानंतर डॉक्टर इथून निघून जातात आणि दामिनी सांगते की, लेप पारूकडून बांधून घ्यायची काहीच गरज नाही. आपण दुसऱ्या डॉक्टरांना सांगू त्यानंतर तिकडून सगळेजण निघून जातात तर डॉक्टरांना पारू बाहेर भेटते आणि आदित्यची, आदित्यच्या पायाची चौकशी करते तेव्हा डॉक्टर पारूचं कौतुक करत योग्य आणि उत्तम लेप लावलास आणि तू आयुर्वेद कुठून शिकली असं विचारतात. यावर पारू मी माझ्या गावाकडे शिकली माझे आजोबा हे वैद्य होते त्यांनीच मला हे शिकवलं असं सांगते. त्यानंतर पारू तिच्या घरात असते तेव्हा दामिनी नाटक करत धावत धावत पारूकडे येते आणि पारूसमोर पदरपासून म्हणते की आदित्यला तुझ्या लेपची गरज आहे तुझ्या लेपमुळे आदित्यला बरं वाटलं आहे. त्यामुळे तू लगेच मला लेप बनवून दे. यावर पारूलाही खरं वाटतं आणि ती लेप बनवायला जाते. तर त्यानंतर दामिनीच्या लक्षात येतं की पारू घरात आली नाही पाहिजे म्हणून ती सांगते की तू घरी येऊ नकोस तू मला इथेच लेप बनवून दे. यावर पारू विचारते का?, तेव्हा दामिनी सांगते की, अहिल्यादेवीनी तुला बंगल्यात येण्यास मनाई केली आहे.

आणखी वाचा – ‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाण व सौरभ चौघुले यांचा नव्या घरात गृहप्रवेश, फोटोमध्ये दिसली झलक, म्हणाला, “एक स्वप्न…”

हे ऐकल्यावर पारू शांतच होते. तर त्या मालिकेच्या पुढील भागात पारूकडून दामिनी लेप बनवून घेऊन येते आणि अहिल्या देवींना दाखवते आणि सांगते की, हा लेप देताना पारूने मला एक अट घातली आहे की, या घरात एकतर दिशा राहील नाहीतर मी आता अहिल्यादेवी यावर काय निर्णय घेणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: marathi serialpaaru serialPaaru Serial Updatezee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
Bigg Boss Marathi season 4 winner Akshay Kelkar shared special glimpse of his new house video viral on social media

Video : असं आहे सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे नवीन घर, घरात स्वामी समर्थ व छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा, नावाच्या अनोख्या पाटीनेही वेधलं लक्ष

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.