गुरूवार, जून 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘जीव माझा गुंतला’ फेम योगिता चव्हाण व सौरभ चौघुले यांचा नव्या घरात गृहप्रवेश, फोटोमध्ये दिसली झलक, म्हणाला, “एक स्वप्न…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जून 9, 2024 | 8:10 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Yogita chavan and saurabh chaughule new home

'जीव माझा गुंतला' फेम योगिता चव्हाण व सौरभ चौघुले यांचा नव्या घरात गृहप्रवेश, फोटोमध्ये दिसली झलक, म्हणाला, "एक स्वप्न…"

काही महिन्यांपासून मराठी सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय कलाकार जोड्या विवाह बंधनात अडकताना पाहायला मिळाल्या. यामध्ये ‘जीव माझा गुंतला’ फेम अभिनेत्री योगिता चव्हाण व अभिनेता सौरभ चौगुले यांच्या ही शाही विवाह सोहळ्याची विशेष चर्चा रंगली. छोट्या पडद्यावरील ही ऑनस्क्रीन जोडी आता खऱ्या आयुष्यातही एकत्र लग्न बंधनात अडकलेली पाहायला मिळाली. योगिता व सौरभ यांनी ३ मार्च रोजी विवाह सोहळा उरकला. दोघांच्या लग्नातील शाही विवाहसोहळ्याच्या फोटोंनी चाहत्यांच लक्ष वेधून घेतलं. कुटुंबीय, नातेवाईक व मित्र परिवाराच्या उपस्थितीत त्यांनी हा विवाह सोहळा उरकला. (Yogita chavan and saurabh chaughule new home)

दोघांच्या लग्नाची विशेष चर्चा राहिलेली पाहायला मिळाली. त्यांच्या लग्नातील फोटो, व्हिडीओदेखील सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले. याशिवाय ही जोडी चर्चेत आली ती म्हणजे त्यांच्या लग्नानंतरच्या हनिमून डेस्टिनेशनमुळे. दोघेही थायलंडला हनिमूनला गेलेले पाहायला मिळाले. तेथील अनेक फोटो त्यांनी चाहत्यांसह शेअर केलेले पाहायला मिळाले. यानंतर आता योगिता व सौरभ यांनी सोशल मीडियावरुन चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. योगिता व सौरभ सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असतात. नेहमीच काही ना काही शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.

आणखी वाचा – “आता अरुंधतीचं तिसरं लग्न दाखवणार का?”, ‘आई कुठे…’ मालिकेतील ऋषी सक्सेनाच्या एण्ट्रीनंतर अरुंधतीला केलं ट्रोल, म्हणाले, “आधीच ३ मुलं आहेत आणि…”

View this post on Instagram

A post shared by Saorabh Rajnish Choughule (@mesaorabh)

अशातच योगिता व सौरभ यांनी चाहत्यांसह एक आनंदाची बातमी शेअर केली आहे. लग्नानंतर दोघांनी आता नव्या घरात गृहप्रवेश केलेला पाहायला मिळत आहे. नव्या घराचे फोटो शेअर करत दोघांनी नवं घर घेतलं असल्याची खुशखबर ल शेअर केली आहे. योगिता-सौरभच्या पहिल्या फोटोमध्ये दोघंही घरात गृहप्रवेश करताना दिसत आहेत. यावेळी दोघांचा पारंपरिक अंदाज लक्षवेधी ठरत आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये योगिता व सौरभ यांच्या नावाची आकर्षक अशी पाटी लक्ष वेधून घेत आहे.

आणखी वाचा – सासरी रमली पूजा सावंत, सासू-सासऱ्यांच्या लग्नाचा वाढदिवसही दणक्यात साजरा केला अन्…; सासरच्या मंडळींच्या साधेपणाने वेधलं लक्ष

मुंबईतील पवई येथे दोघांनी हे नवं घर घेतलं असल्याचं समोर आलं आहे. ही पोस्ट शेअर करत त्याखाली कॅप्शन देत त्यांनी असं लिहिलं आहे की, “एक स्वप्न आपलं, एकत्र पूर्ण करुया, नवीन शहरात, नवीन संसार थाटूया, नव्या सुरुवातीचे स्वागत”, असं खास कॅप्शन त्यांनी दिलं आहे.

Tags: marathi actormarathi actressyogita chavan and saurabh chaughuleyogita chavan and saurabh chaughule new home
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
saatvya mulichi satvi mulgi marathi serial update Rupali taking care of the falguni new twist

एकीकडे रुपाली घेत आहे घरातल्यांची काळजी तर दुसरीकडे इंद्राणीकडून श्लोकाचे वाचन, अस्तिकट्टयार मिळणार का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.