शॉपिंग हा महिला वर्गाचा जिव्हाळ्याचा विषय आहे. विविध ठिकाणांना भेट देत आजकाल महिला शॉपिंग करायला घराबाहेर पडताना दिसतात. युट्युबवरुन वा सोशल मीडियाच्या माध्यमातून आजकाल शॉपिंग संदर्भात असे अनेक व्हिडीओ बनवले जातात. ज्यामुळे शॉपिंग करणे हे खूप सोप्प झालं आहे. या व्हिडीओद्वारे मिळालेल्या माहितीनुसार स्त्रिया त्या ठिकाणी पोहोचून शॉपिंग करताना दिसतात. अशातच आता सोशल मीडियावर वायरल होणाऱ्या एका व्हिडीओने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. या व्हिडीओमध्ये एक खासियत आहे ती म्हणजेच प्लस साइज. (Plus size clothes available)
अंगाने, शरीराने लठ्ठ असणाऱ्या व्यक्तींसाठी बरेचदा कपड्यांचे पर्याय फार कमी असतात. त्याच्यामुळे या महिला वर्गाचा शोध चालूच असतो. मात्र आता या शोधाला पूर्णविराम देत ‘मज्जा पिंक’ या युट्युब चॅनलने काही पर्याय शोधून काढले आहेत. ज्यामुळे या महिला वर्गाची चिंता दूर होऊ शकते. एकाच दुकानात वेगवेगळे प्रकार, हवे ते रंग किंवा मोठी साईज असलेल्या पॅन्ट कुठे सापडू शकतात यावर तोडगा काढला आहे. कुर्त्याखाली घालता येणाऱ्या पॅन्टमध्ये हटके डिझाईन, वेगवेगळं मटेरियल, हवे ते रंग आणि मुळात योग्य अशी साइझ अगदी सहज आणि खिशाला परवडेल अशा किमतीत कुठे मिळेल यासाठीचा हा व्हिडीओ नक्की पहा.
‘गाला टेक्स्टाईल’मध्ये प्लस साइज उपलब्ध आहेत. अगदी 4xl ते 8xl पर्यंत इथे साइझ उपलब्ध आहेत. येथे प्लस साइज लेगीन्स ५०० रुपयाला उपलब्ध आहेत. याशिवाय येथे सिगारेट पॅन्ट ज्या सलवार खाली घातल्या जातात त्यादेखील उपलब्ध आहेत. याची सुरुवात ३५० रुपयांपासून होते. जशी साइझ वाढते तसे रकमेत ५० रुपये अधिक वाढ होते. स्ट्रेचेबल पॅन्ट येथे ६०० रुपयांपासून उपलब्ध आहे. या पॅन्टचा कपडा पाहता हा कपडा फाटण्याची शक्यता फार कमी आहे. हवे त्या रंगात येथे या पॅन्ट व लेगीन्स उपलब्ध आहेत.
काही लोकांना स्ट्रेचेबल पॅन्ट नको असेल त्यांच्यासाठी येथे कम्फर्टेबल पॅन्ट उपलब्ध आहे. याची किंमत ६०० ते ६५० रुपयांपासून सुरु आहे. हवा तो रंग इथे उपलब्ध असून या पॅन्टला खिसे देखील आहेत. तसेच आतून कपड्याला डबल शिलाई असल्याने या फाटण्याची शक्यता कमी आहे. तसेच येथे लखनवी पॅन्टही उपलब्ध आहेत. याची सुरुवात ९५० रुपयापासून सुरु होते. कलमकरी पॅन्ट येथे ५५० रुपयांपासून सुरु आहेत. आणि यामध्ये अनेक डिझाइन उपलब्ध आहेत. तसेच प्लस साइजमध्ये गरारा शराराही उपलब्ध आहे. याची सुरुवात ५५० पासून होऊन अगदी ११०० रुपयांपर्यंत वेगवेगळ्या डिझाइन उपलब्ध आहेत. दुकान नंबर ३२, गाला टेक्सटाईल, महावीर गल्ली, हिंदमाता क्लॉथ मार्केट, दादर ईस्ट येथे हे दुकान असून या दुकानाला तुम्ही अवश्य भेट द्या.