‘पारू’ मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे प्रिया व प्रीतम यांचं जुळवून देण्यासाठी आदित्य, पारू यांचे जोरदार प्रयत्न सुरु असतात. काही करुन तिच्या वडिलांना आणि भावाला इम्प्रेस करुन त्यांच्याकडे प्रीतमसाठी हात मागायचा असं ठरवलेलं असतं आणि यासाठी प्रिया ही त्यांना मदत करत असते. यासाठी प्रीतम, पारू व आदित्य प्रियाच्या गावी नोकर बनून गेलेले असतात. मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, इकडे पारू पहाटे उठून तुळशीची पूजा करते आणि म्हणते की आज मी आदित्य सरांच्या नावाचं मंगळसूत्र घालून जगासमोर वावरतेय हे खूप उत्तम आहे. (Paaru Serial Update)
हे आनंदाचे क्षण मला जगायला खूप आवडत आहेत. त्यानंतर ती घरात जाते आणि आदित्यला जाग येते. आदित्य उठल्या उठल्या ब्रेकफास्टला काय आहे, मला खूप भूक लागली आहे असं म्हणतो. तेव्हा पारू त्याला आठवण करुन देते की, आपण इकडे प्रियाच्या घरी आहोत. पण तरी मी तुमच्यासाठी काहीतरी बनवते. त्यानंतर पारू किचनमध्ये जाते तर तिकडे त्या मावशी असतात त्या पारूला किचनची ओळख करुन देतात. साहेबांना आल्याचा वासही आवडत नाही असं त्या मावशी पारूला सांगतात. मात्र पारू त्या मावशींना सांगतात की, बाहेर खूप थंडावा आहे. आणि साहेबांना खोकला पण झाला आहे त्यामुळे असुदे.
त्यांनतर पारू त्यांना चहा द्यायला जाते तर त्यांना पारूच्या हातचा फक्कड चहा आवडतो आणि त्या तिचं कौतुक करतात. त्यांनतर इकडे दिवस उजडाला तरी प्रीतम झोपलेला असतो तेव्हा प्रियाचा भाऊ येऊन त्याला उठवतो आणि त्याला गोठा साफ करून घ्यायला सांगतो. तर इकडे आदित्य, प्रीतम नसल्याने आदित्यच्या ऑफिसच्या कामाची सर्व जबाबदारी अहिल्यादेवींनी दिशावर सोपवलेली असते. त्यावेळी दामिनी तिथे येते आणि अहिल्यादेवींकडे न्याय मागत मला सुद्धा कामाची जबाबदारी द्या असं सांगते.
आणखी वाचा – “भिंतीवर डोकं आपटून…”, IVF उपचारादरम्यान प्रिती झिंटाची झाली होती अशी अवस्था, म्हणाली, “मानसिक त्रास…”
अहिल्यादेवी दामिनीची परीक्षा घेताच ती भानावर येते आणि निघून जाते. तर इकडे प्रियाच्या वडिलांसह आदित्य शेतात काम करायला जातो. आता आदित्य, प्रीतम व पारू प्रियाच्या घरच्यांची मन कशी जिंकणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.