रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Paaru Marathi Serial : प्रियाच्या घरच्यांची मन जिंकण्यासाठी आदित्य, प्रीतमचा प्रवास सुरु, दोघांच्या लग्नाला होकार मिळणार का?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
सप्टेंबर 4, 2024 | 10:38 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Paaru Serial Update todays episode

पारू मालिकेत सुरु आहे प्रिया प्रीतम एकत्र येण्यासाठीचा टास्क

‘पारू’ मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे प्रिया व प्रीतम यांचं जुळवून देण्यासाठी आदित्य, पारू यांचे जोरदार प्रयत्न सुरु असतात. काही करुन तिच्या वडिलांना आणि भावाला इम्प्रेस करुन त्यांच्याकडे प्रीतमसाठी हात मागायचा असं ठरवलेलं असतं आणि यासाठी प्रिया ही त्यांना मदत करत असते. यासाठी प्रीतम, पारू व आदित्य प्रियाच्या गावी नोकर बनून गेलेले असतात. मालिकेच्या आजच्या भागात असं पाहायला मिळणार आहे की, इकडे पारू पहाटे उठून तुळशीची पूजा करते आणि म्हणते की आज मी आदित्य सरांच्या नावाचं मंगळसूत्र घालून जगासमोर वावरतेय हे खूप उत्तम आहे. (Paaru Serial Update)

हे आनंदाचे क्षण मला जगायला खूप आवडत आहेत. त्यानंतर ती घरात जाते आणि आदित्यला जाग येते. आदित्य उठल्या उठल्या ब्रेकफास्टला काय आहे, मला खूप भूक लागली आहे असं म्हणतो. तेव्हा पारू त्याला आठवण करुन देते की, आपण इकडे प्रियाच्या घरी आहोत. पण तरी मी तुमच्यासाठी काहीतरी बनवते. त्यानंतर पारू किचनमध्ये जाते तर तिकडे त्या मावशी असतात त्या पारूला किचनची ओळख करुन देतात. साहेबांना आल्याचा वासही आवडत नाही असं त्या मावशी पारूला सांगतात. मात्र पारू त्या मावशींना सांगतात की, बाहेर खूप थंडावा आहे. आणि साहेबांना खोकला पण झाला आहे त्यामुळे असुदे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : BB फार्ममधून दूध मिळवण्यासाठी स्पर्धक पुन्हा एकमेकांना भिडले, कुणी धक्काबुक्की केली तर कुणी अरेरावी, नवीन प्रोमो व्हायरल

त्यांनतर पारू त्यांना चहा द्यायला जाते तर त्यांना पारूच्या हातचा फक्कड चहा आवडतो आणि त्या तिचं कौतुक करतात. त्यांनतर इकडे दिवस उजडाला तरी प्रीतम झोपलेला असतो तेव्हा प्रियाचा भाऊ येऊन त्याला उठवतो आणि त्याला गोठा साफ करून घ्यायला सांगतो. तर इकडे आदित्य, प्रीतम नसल्याने आदित्यच्या ऑफिसच्या कामाची सर्व जबाबदारी अहिल्यादेवींनी दिशावर सोपवलेली असते. त्यावेळी दामिनी तिथे येते आणि अहिल्यादेवींकडे न्याय मागत मला सुद्धा कामाची जबाबदारी द्या असं सांगते.

आणखी वाचा – “भिंतीवर डोकं आपटून…”, IVF उपचारादरम्यान प्रिती झिंटाची झाली होती अशी अवस्था, म्हणाली, “मानसिक त्रास…”

अहिल्यादेवी दामिनीची परीक्षा घेताच ती भानावर येते आणि निघून जाते. तर इकडे प्रियाच्या वडिलांसह आदित्य शेतात काम करायला जातो. आता आदित्य, प्रीतम व पारू प्रियाच्या घरच्यांची मन कशी जिंकणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.

Tags: marathi serialpaaru marathi serialPaaru Serial Update
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Marathi comedy actor Kushal Badrike shared picnic video of his friend Santosh Juvekar, Abhijeet Chavan and Viju Mane

Video : पिकनिकमध्ये संतोषने एकट्यानेच केलं काम, त्याची अवस्था पाहून कुशलला हसू आवरेना, व्हिडीओही केला शेअर, म्हणाला, "सगळ्यांची काळजी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.