Bigg Boss Marathi 5 Update : सध्या छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो ‘बिग बॉस मराठी’चे नवीन पर्व चांगलेच चर्चेत आहे. या शोमध्ये सहभागी झालेले स्पर्धक तसेच त्यांच्यामध्ये सुरु असलेले वाद व भांडणं यामुळे नवीन पर्वाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकतंच झालेल्या ‘बिग बॉस’च्या ‘भाऊचा धक्का’मध्ये रितेश देशमुखने घरातील स्पर्धकांची चांगलीच शाळा घेतली. कोणाचे काय चुकले? आणि कोणी काय करायला हवे? या सर्व गोष्टी रितेशने सांगितल्या. दर आठवड्याच्या रविवारी एलिमेशन पार पडते आणि या एलिमिनेशनमध्ये पुरुषोत्तम दादा पाटील हा स्पर्धक घराबाहेर पडला आहे. नवीन पर्वातील पहिल्याच आठवड्यात पुरुषोत्तम दादा पाटील यांचा घरात सहभाग नसल्याने हा स्पर्धक घराबाहेर पडला आहे.
यंदाच्या पर्वातील पहिल्या आठवड्यात ‘बिग बॉस’च्या घरातील सहा सदस्य नॉमिनेट झाले असल्याच समोर आलं. या स्पर्धकांमध्ये वर्षा उसगांवकर, योगिता चव्हाण, अंकिता प्रभू-वालावलकर, सूरज चव्हाण, धनंजय पोवार आणि पुरुषोत्तमदादा पाटील या सदस्यांचा समावेश होता. यापैकी वर्षा उसगांवकर, अंकिता वालावलकर व सुरज चव्हाण हे तीन सदस्य सुरक्षित असल्याचे रितेशने कालच्या भागात सांगितले. त्यामुळे या सहा सदस्यांपैकी वर्षा, सुरज, अंकिता, योगिता व धनंजय हे स्पर्धक सुरक्षित झाले असून पुरुषोत्तम पाटील या स्पर्धकाचा या घरातील प्रवास संपला आहे.
‘भाऊचा धक्का’ या खास कार्यक्रमात रितेशने काही खास टास्क केले यामध्ये स्पर्धकांमध्ये आपापसात चांगलीच जुंपली. घरातील सर्व स्पर्धकांनी एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप केले. एकमेकांची तक्रार सांगितली. तसेच एकमेकांची उणीधुणीही काढली. अशा सर्वच स्पर्धकांचा रितेशने समाचार घेतला. सर्व स्पर्धकांचे ऐकून घेतले त्याचबरोबर सर्व स्पर्धकांना ऐकवलेदेखील. अशातच ‘भाऊचा धक्का’ या भागाच्या शेवटी त्यांनी घराबाहेर पडणाऱ्या स्पर्धकाचे नाव जाहीर केले आणि हा स्पर्धक म्हणजे पुरुषोत्तम दादा पाटील होते.
आणखी वाचा – बॉलिवूडचा ‘मिस्टर परफेक्शनिस्ट’ अभिनयातून होतोय निवृत्त?, आमीर खानच्या लेकाचा मोठा खुलासा, म्हणाला…
दरम्यान, ‘बिग बॉस’ मराठीच्या नव्या पर्वाला धमाकेदार सुरुवात झाली असून रोज रात्री ९ वाजता ‘बिग बॉस मराठी’ हा शो प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. २४ तास ड्रामा सुरु असणाऱ्या ‘बिग बॉस मराठी’च्या घरात स्पर्धकांना नुकताच एक आठवडा सुरु झाला असून या पर्वाची सुरुवात भांडण व वादांनी झाली. आता अजून पुढे घरात काय घडणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.