Paaru Serial Upcoming Episode : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, किर्लोस्कर बंगल्यात रक्षाबंधन सुरु असतं. पारू आदित्यला राखी बांधायला जाणार तितक्यातच असं घडतं की, सावित्रीला अहिल्यादेवींनी किचन मधून प्रसादाचं ताट आणायला सांगितलेलं असतं. किचनमध्ये गेल्यावर सावित्रीच्या लक्षात येतं की, अहिल्यादेवींनी साखर नव्हे तर मीठ नारळी वडीत मीठ घातलं आहे आणि सावित्री धावत धावत येऊन हे सगळं काही अहिल्यादेवींना सांगते. यावर श्रीकांत ते चाखून बघतो तर त्यात मिठाचे प्रमाण प्रचंड असतं आणि साखर बिलकुल नसते. तेव्हा गुरुजी सांगतात की प्रसादाला उशीर व्हायला नको लवकरात लवकर काय ते करा.
यानंतर अहिल्यादेवी पारुला म्हणतात की, नारळाच्या वड्या करायला किती मिनिट लागतील?, यावर पारू वीस मिनिट सांगते आणि अहिल्यादेवी तिला सांगतात की, पारू चल माझ्याबरोबर, असं म्हणत त्या दोघी किचनमध्ये जातात आणि नारळाच्या वड्या करतात. त्यामुळे पारू आदित्यला राखी बांधू शकत नाही त्यामुळे हे काही दिशा व दामिनीला खटकलेलं असतं. नारळाच्या वड्या बनवून झाल्यावर अहिल्यादेवी पारूचं कौतुक करतात तर सावित्री ही पारूचं कौतुक करते. त्यानंतर दिशा तिच्या रूममध्ये आलेली असते तेव्हा दिशाच्या लक्षात येतं की, तिची पर्स तिला सापडत नाही. तेव्हा ती विचार करु लागते की, माझी पर्स नेमकी कुठे गेली असेल आणि त्या पर्समध्ये इम्पॉर्टंट फोटो असतो जो तिला हवाच असतो. त्यामुळे ती अजून टेन्शनमध्ये येते. त्यावेळेला दामिनी चोरी केल्याचा आरोप गणीवर घालते.
दिशा व दामिनी दोघी मिळून गणीकडे जातात आणि त्याला विचारतात की, तू माझी बॅग चोरी केलीस का?, तूच माझ्या रूममध्ये आला होता. त्यावर गणी नकार देतो. त्यानंतर दामिनी जाऊन घरामध्ये चेक करते तेव्हा तिला पारुची नवी पर्स दिसते. ती पर्स बाहेर घेऊन येते आणि विचारते की, ही पर्स कुठून आली?, तेव्हा गणीने तिला भेटवस्तू दिली असल्याचं सांगतात. दिशा म्हणते की, तू माझ्या पाकिटातले पैसे चोरून तिच्यासाठी नवी पर्स घेतलीस का?, यावर गणीला पारू विचारतात, तुला बाने पैसे दिले नाहीत तर ही पर्स तू आणलीस कुठून मात्र गणी काहीच बोलत नाही. तितक्यात तिथं प्रीतम व प्रिया येतात. प्रीतम प्रियाच्या हातून दिशाची पर्स देतो आणि सांगतो की ही पर्स बेड खाली गेली होती मला सापडली म्हणून मी आणून दिली. हे ऐकल्यावर दिशाच्या जीवात जीव येतो. त्यानंतर प्रिया दिशाला माफी मागायला सांगते मात्र दिशा काही माफी मागत नाही आणि ती तिथून निघून जाते. त्यानंतर प्रीतम गणीची माफी मागतो. गणीकडून कळतं की, त्याने मोलमजुरी करुन पारुसाठी ही नवी कोरी पर्स विकत घेतली आहे. हे ऐकल्यावर सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी येतं तेव्हा प्रीतम सांगतो की, मला एखादी बहीण असावी असं वाटत होतं. पण मी इतका चांगला भाऊ नक्कीच झालो नसतो असं म्हणत त्यांच्याही डोळ्यात अश्रू येतात.
मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, इकडे गुरुजींनी प्रीतम व दिशाच्या लग्नाचा मुहूर्त काढलेला असतो. तर प्रिया किचनमध्ये येत पारूला सांगते बाहेर जे काही सुरु आहे ते थांबवावच लागेल. नाही तर प्रीतम सर कधी सुखी होऊ शकणार नाहीत आणि हे सगळं काही अहिल्यादेवींना सांगावंच लागेल. आता पारू दिशाचा खरा चेहरा अहिल्यादेवींसमोर आणणार का?, हे सारं पाहणं रंजक ठरेल.