Bigg Boss Marathi new update : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या पर्वात सर्व स्पर्धक धुमाकूळ घालताना दिसत आहेत. यंदाच्या या पर्वात विशेष चर्चेत असलेलं नाव म्हणजेच निक्की तांबोळी. ‘बिग बॉस हिंदी’मधून निक्कीने प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं होतं. आता ‘बिग बॉस मराठी’च्या या नव्या पर्वातून ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यास सज्ज झाली आहे. कोणत्या ना कोणत्या कारणावरुन सततचे वाद करत निक्की नेहमी चर्चेत असते. मात्र निक्की समजूतदार असून ती प्रत्येक स्पर्धकाशी समजून त्या त्या परिस्थितीनुसार बोलतानाही दिसते.
बरेचदा निक्कीच्या तोंडून वयाचे भान न राहता इतर स्पर्धकांचा अपमानही झालेला आहे तर भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने यावेळी निक्कीची चांगली शाळा देखील घेतलेली पाहायला मिळाली. निक्कीचा आज वाढदिवस असून हा खास वाढदिवस ‘बिग बॉस’च्या घरात साजरा होताना पाहायला मिळतोय. ‘बिग बॉस’च्या घरात निक्कीचा वाढदिवसादिवशी तिला दुसऱ्या गटातील स्पर्धकांनी शुभेच्छा दिलेल्या पाहायला मिळत आहेत आणि या हटके शुभेच्छा साऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.
नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, धनंजय हा निक्कीला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गार्डन एरियामधील एक झाड घेऊन येतो आणि समोर बसून तिला म्हणतो की, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. या शुभेच्छा देताना धनंजय असेही म्हणतो की, “तू ७५ वर्ष जग. का ७५ वर्ष तर असंच तारुण्य टिकवून जग. लोकांना आनंद दे. लोकांना छळू नको. साक्ली उठल्यावर ते रात्री झोपेपर्यंत त्यांना दुःखद त्रास काही देऊ नकोस. त्यांच्या नरड्यावर पाय दे. नरड्यावर पाय देऊन उभी राहा. आणि जिंक पण त्यांना मानसिक त्रास काही देऊ नकोस”.
आणखी वाचा – Paaru Marathi Serial : पारू दिशाचा खरा चेहरा अहिल्यादेवींसमोर आणू शकेल का?, प्रिया-प्रीतमची साथ आणि…
पुढे डीपी बोलतो, “तुला या वाढदिवसाच्या लक्ष लक्ष, कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक साधासुधा एक पलीकडच्या ग्रुपमधील गरीब माणूस”, असं म्हणत निक्कीच्या पाया पडतो. यावर निक्की त्याचे आभार मानते आणि आज तरी मला माफ करा असं बोलते. यानंतर अंकिता, अभिजीत निक्कीला मिठी मारतात आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतात”.