शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

पारूच्या डोळ्यांचं रहस्य नेमकं आहे तरी काय?, तिच्याच डोळ्यांमध्ये हरवून गेला आदित्य, किर्लोस्करांच्या घरात नवं स्थान मिळणार का?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 30, 2024 | 12:59 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru Serial Promo

पारूच्या डोळ्यांचं रहस्य नेमकं आहे तरी काय?, तिच्याच डोळ्यांमध्ये हरवून गेला आदित्य, किर्लोस्करांच्या घरात नवं स्थान मिळणार का?

‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन प्रतिसाद देताना दिसत आहेत. अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांनी पसंती दिली आहे. या मालिकेतील कथानकाच्या जोरावर व मालिकेत येणाऱ्या रंजक वळणामुळे ही मालिका अव्वल स्थानावर आहे. या मालिकेत पारूचा संघर्ष पाहायला मिळत आहे. पारू व आदित्य यांच्यातील मैत्रीपूर्व नातं साऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. मालिकेत पारूची भूमिका अभिनेत्री शरयू सोनावणे साकारत आहे. तर आदित्यच्या भूमिकेत प्रसाद जवादेला पाहणं रंजक ठरतंय. पारू व आदित्यची जोडी लोकप्रिय जोडींपैकी एक आहे. (Paaru Serial Promo)

मालिकेत सध्या पारूवरील संकट टळलेलं पाहायला मिळालं. आदित्य सुखरूप पारूला घरी घेऊन येतो. हॉस्पिटलमध्ये असतानाही आदित्य पारुसाठी बरीच धावपळ करताना दिसतो. घरी आल्यानंतरही तो पारूची विशेष काळजी घेत असतो. ही गोष्ट दामिनी व दिशाला दिसताच त्यांनाही खटकते. तर एकीकडे आदित्य पारूचा विचार करत असतो. पारूच्या विचारात असलेल्या आदित्यला कळतंच नाही की तो पारूचा इतका विचार का करत आहे. एकूणच मालिकेत आता लवकरच दोघांचा प्रेमाचा ट्रॅक सुरु होणार असल्याची शक्यता दिसत आहे.

आणखी वाचा – पारू सुखरूप घरी परतली, आदित्यची काळजी पाहून दिशा व दामिनीच्या मनात संशय, नवा डाव आखणार का?

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

पारू मालिकेच्या नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या प्रोमोमध्ये, आदित्य लोगोसाठी डोळे शोधत असतो. तो लोगोसाठी अगदी योग्य अशा डोळ्यांची निवड करण्यासाठी सांगतो. तेव्हा त्याला पारूचे डोळे दिसतात. आणि तितक्यात पारू स्वतःही त्याच्या समोर येते. तेव्हा आदित्य पारूकडे पाहतच राहतो. हे डोळे पहा, सतत काहीतरी बोलतायत. असं वाटत या डोळ्यांकडे बघत रहावं, असेही तो बोलताना दिसतो. प्रोमोमध्ये आदित्य हा पारूच्या डोळ्यात हरवून गेलेला असतो. पारूच्या डोळ्यांच्या तो प्रेमात पडतो.

आणखी वाचा – ठरलं तर मग! सायली, अर्जुन व चैतन्य मिळून साक्षीला शिकवणार धडा, नवा डाव आखत अद्दल घडवणार अन्…

आता किर्लोस्कर कंपनीच्या लोगोसाठी पारूच्या डोळ्यांची निवड होणार का?, आदित्य पारूच्या प्रेमात पडून किर्लोस्कर घरात स्थान मिळवणार का?, हे पाहणं रंजक ठरेल.

Tags: entertainmentpaaru marathi serialPaaru Serial Promozee marathi
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Kadambari Mali Interview
Entertainment

“१६ वर्षाचीच मुलगी Lead हवी”, लीडच्या भूमिका न मिळण्यावर मराठी अभिनेत्रीच भाष्य, म्हणाली, “फुकट काम…”

एप्रिल 18, 2026 | 11:00 am
Humidity Infections Summer health issues
Lifestyle

आजकाल तुम्हालाही ताप आणि पोटदुखीचा त्रास होतोय का?, असे होण्यामागचं कारण आहे…

एप्रिल 18, 2026 | 9:50 am
Next Post
Mahesh Manjrekar said that he likes and he loves to smoke cigarettes

"सिगारेट ओढणारच आणि…", कॅन्सरनंतर डॉक्टरांनी ओरडूनही ऐकले नाहीत महेश मांजरेकर, म्हणाले, "मरणार नसल्याची शाश्वती द्या तरच…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.