Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’ चं पाचवं पर्व प्रचंड चर्चेत असून बिग बॉसच्या घरात स्पर्धकांमध्ये वादावादी झालेली पाहायला मिळत आहे. टीम A आणि टीम B मध्ये ताटातूट झाली असून दोन्ही गटातील स्पर्धक एकमेकांच्या विरोधात जाताना दिसत आहेत. अशातच ‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या आठवड्यात घरात मानकाप्याची एन्ट्री झाली आहे. आता संपूर्ण आठवडाभर घरात मानकाप्याची दहशत असणार आहे. या दहशतीमुळे ‘बिग बॉस’ने घरातील सर्व सदस्यांना एकटं फिरण्यास मनाई केली आहे. या आठवड्यात घरात सगळीकडे भूताची थीम बनवण्यात आली आहे. याशिवाय घरातल्या सगळ्या लाइट्स चालू-बंद करण्यात आल्या. यावेळी एकट्याने फिरण्यास मनाई आहे असं ‘बिग बॉस’कडून स्पष्ट करण्यात आलं. (Bigg Boss Marathi 5 New Promo)
एकटं राहू नये यासाठी घरात ‘बिग बॉस’कडून सगळ्या स्पर्धकांच्या जोड्या तयार करण्यात आल्या आहेत. अभिजीत व निक्कीची अपेक्षेप्रमाणे पहिली जोडी ‘बिग बॉस’ने जाहीर केली. बिग बॉसच्या घरात काल नवीन नॉमिनेशन टास्क पार पडले. यात घरातील बिग बॉसने नेमून दिलेल्या जोडीला योग्य कारणासहित नॉमिनेट करायचे होते. या टास्कमध्ये पहिल्यांदा निक्की तांबोळी, त्यानंतर अंकिता वालावलकर व अंकितानंतर जान्हवी किल्लेकर नॉमिनेशन टास्कसाठी गेली होती. अशातच आता या नॉमिनेशन टास्कमध्ये छोटा पुढारी म्हणजेच घन:श्याम दरवडे जाणार आहे.
आणखी वाचा – धक्कादायक! एकाच दिवशी सुप्रसिद्ध अभिनेत्रीने आई व बहिणीला गमावलं, जगणंही झालं कठीण, असं काय घडलं?
नॉमिनेशन टास्कसाठी मानकापाच्या गुहेत घन:श्याम गेला असून या ठिकाणी जाताच निग बॉसने त्याची चांगलीच शाळा घेतली आहे. यावेळी बिग बॉसने त्याला आधी एका चौकोनात उभं राहायला सांगितलं. त्यानंतर भिंतीसमोर पाठ करून उभं राहायला सांगितलं. पण तिथे भिंतच नसल्याने घन:श्याम गोंधळून गेला आहे. यानंतर घन:श्याम वळायला सांगितले नसतानासुद्धा घन:श्याम वळला. त्यामुळे यावरूनही बिग बॉस घन:श्याम मी वळायला सांगितलं?” असं म्हणतात. घनश्यामचा हा नवीन प्रोमो खूपच मजेशीर आहे.
दरम्यान, निक्की वैभव व डीपी या जोडीला घालूनपाडून बोलून नॉमिनेट करते. यानंतर ती जान्हवीला तिची सावली म्हणत तिलाही नॉमिनेट करते आणि तिच्याबरोबर सूरजला नॉमिनेट करते. यानंतर जान्हवीला मानकाप्याच्या गुहेत बोलावलं जातं, निक्कीने नॉमिनेट केलेल्या एका जोडीला काढून त्याजागी दुसऱ्या जोडीला नॉमिनेट करण्याचे आदेश तिला जातात. निक्की-अभिजीतला ती नॉमिनेट करते. या दोघांना मूर्ख म्हणत ती नॉमिनेशन टास्क पार पाडते.