‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ ही मालिका जेव्हपासून सुरु झाली तेव्हापासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. अल्पावधीतच या मालिकेने प्रेक्षकांची मन जिंकली. गाव खेड्यात सुरु असणार मालिकेचं शूट, कथानकाला असलेला गावरान टच या मालिकेला एका उंचीवर घेऊन जात आहे. मालिकेत पाहायला गेलं तर सगळेच कलाकार त्यांच्या भूमिका उत्तमपणे निभावताना दिसत आहेत. पारू व आदित्यची जोडी तर प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून धरलेली पाहायला मिळाली. आता मालिकेत नवनवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. (Paaru Troll By Netizens)
मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, हरीशबरोबरचं पारूचं लग्न मोडलेले आहे. पारूने आदित्य आणि मंगळसूत्राचं सत्य हरीशला सांगितलेलं असत त्यावेळी हरीश पारूबरोबरचं लग्न मोडतो आणि सर्वांना त्यालाच पारूबरोबर लग्न करायचं नव्हतं असं खोटं सांगतो. याशिवाय लेकीचं लग्न मोडलं म्हणून मारुती स्वतःला दोष देतो आणि आत्महत्येचा प्रयत्न करतो. पारू या सगळ्यात भरडलेली दिसत आहे. पारू तिच्या परीने ही परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
गावाकडून शहरात आलेल्या पारूचा प्रवास मालिकेत पाहायला मिळत आहे. गावरान भाषेत पारूचं बोलणं काहींच्या पसंतीस पडत आहे तर काहींना ते खटकताना दिसत आहे. गावरान भाषेत पारूचं बोलणं ऐकून आता नेटकऱ्यांनी पारू मालिकेच्या प्रोमोवर कमेंट करत तिला ट्रोल करायला सुरुवात केली आहे. “गावाकडची भाषा पण मेकअप खूप असतो. लिपस्टिक व गालाला लाली लावायची बरी समजते हिला. नाक तर कायम लालच दाखवतात”, असं म्हणत तिची चेष्टा केली आहे.
“बाकीचे शब्द अगदी बरोबर बोलते इशवास, लगीन हे शब्द ऐकून डोक फिरत इतकं पण गावंढळ लोक नसातत जस दाखवत आहात”, “गावठी भाषा वापरते. नीट संवाद कधी नसतात”, “पारू खूप बोर करते”, “पारुच्या भाषेचा कंटाळा आला आहे. आता तिचं लेक्चर ऐकून बोर झालं आहे”, अशा कमेंट करत पारूला तिच्या भाषेवरुन ट्रोलही केलं आहे.