छोट्या पडद्यावरील ‘कन्यादान’, ‘चंद्र आहे साक्षीला’, ‘अजूनही बरसात आहे’ अशा अनेक लोकप्रिय मालिकांमधून व मोठ्या पडद्यावरील ‘सुभेदार’, ‘मिस्टर अँड मिसेस ब्रम्हचारी’, ‘दशक्रिया’, ‘शेंटीमेंटल’ अशा गाजलेल्या चित्रपटात अनेक भूमिका साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे उमा सरदेशमुख. त्यांनी अनेक मालिका व चित्रपटांमधून छोट्या-मोठ्या साकारत प्रेक्षकांचे मनोरंजन केलं आहे. त्यांनी साकारलेली प्रत्येक भूमिका प्रेक्षकांच्या मनात आहे. आपल्या अभिनयाने चर्चेत राहणाऱ्या या अभिनेत्री सोशल मीडियावरही तितक्याच सक्रीय असतात. सोशल मीडियावर त्या आपले अने फोटो व व्हिडीओ शेअर करत असतात.. तसेच त्यांच्या दैनंदीन जीवनातील काही घडामोडीही शेअर करत असतात.
उमा या कामानिमित्त भारतात राहतात. पण त्यांचं मुलगा कामानिमित्त परदेशात राहतो. त्यामुळे त्या उमा आपल्या लेकाला भेटण्यासाठी परदेशात गेल्या असून या परदेशवारीची खास झलक त्यांनी सोशल मीडियाद्वारे शेअर केली आहे. उमा यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे त्यांचा परदेशवारीचा खास व्हिडीओ शेअर केला आहे. भारतातून अमेरिकेत जाण्याची खास झलक त्यांनी एका खास व्हिडीओद्वारे शेयर केली आहे.
आणखी वाचा – Video : अधिपती-अक्षरामध्ये खुललं प्रेम, परदेशात हनिमून करत आहेत एन्जॉय, रोमँटिक व्हिडीओ समोर
उमा सरदेशमुख यांनी इन्स्टाग्रामवर त्यांच्या अमेरिका दौऱ्याचे दोन व्हिडीओ शेअर केले आहेत. यापैकी पहिल्या व्हिडीओमध्ये अमेरिकेत घेऊन जाणाऱ्या सामानाची झलक दाखवली आहे. यामध्ये त्यांनी खाऊची व अमेरिकेत लागणाऱ्या कपड्यांच्या बॅग्स दाखवल्या आहेत, तसेच दुसऱ्या व्हिडीओमध्ये त्यांनी गाडीत बसल्यापासून विमानातून अमेरिकेत पोहोचल्याची झलक दाखवली आहे. अमेरिकेत पोहोचल्यानंतर त्यांनी आपल्या लेकाला अगदी कडकडून मिठी मारली. उमा यांच्या मुलाच्या चेहऱ्यावर त्यांना भेटल्यानंतरचा आनंद पाहायला मिळत आहे.
दरम्यान, आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढत उमा या परदेशात गेल्या असून सध्या अमेरिकेत त्या लेकासह एन्जॉय करत आहेत. याचे काही खास क्षण त्या त्यांच्या सोशल मीडियाद्वारे चाहत्यांबरोबर शेअर करत आहेत. तसेच त्यांच्या या अमेरिकेच्या दौऱ्यानिमित्त अनेक कलाकारांनीही उमा यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच मज्जा कर”, तुझी आठवण येईल” अशा कमेंट्स केल्या आहेत