Paaru Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, किर्लोस्कर बंगल्यात रक्षाबंधन स्पेशल दिवस असतो. सगळेच जण रक्षाबंधनाची तयारी करण्यात व्यस्त असतात. पारू गणीला राखी बांधते यावर गणी पारूला तिला बाजारपेठेत एक आवडलेली पर्स गिफ्ट म्हणून देतो. तेव्हा पारू सांगते की, याची काहीच गरज नव्हती. गणी तू बाला खर्चात पाडलं असं म्हटल्यावर गणीसुद्धा काहीच बोलत नाही. त्यानंतर इकडे मारुतीही अहिल्यादेवींसाठी साडी घेऊन येतो. त्या साडीची किंमत पाहून पारू म्हणते बाळा एवढं महागडे गिफ्ट का आणलं. तेव्हा मारुती सांगतो की, अहिल्यादेवी समोर हे गिफ्ट काहीच नाही आहे. आणि त्या गिफ्टची किंमत कधीच पाहत नाही.
आज मी बंगल्यात ड्रायव्हर म्हणून नाही तर अहिल्यादेवींचा भाऊ म्हणून जाणार आहे. तर थोडा थाट हा हवाच, असं म्हणत तो ऐटीत बंगल्यात निघून जातो. बंगल्यात पोहोचताच श्रीकांत त्याला सोफ्यावर बसायला सांगतो. यावर मारुती आधी नकार देतो. त्यानंतर श्रीकांत सांगतो की, माझ्या बायकोच्या माहेरच्यांची मला सेवा करायलाच हवी, नाही तर माझं काही खरं नाही. यावर अहिल्यादेवी ही मान हलवतात. त्यानंतर अहिल्यादेवी मारुतीचं औक्षण करतात. मारुती अहिल्यादेवींना आणलेली भेटवस्तू देतो. ती साडी पाहून त्या खूप खुश होतात आणि सुंदर साडी आहे असे म्हणत त्या साडीचं कौतुक करतात.
त्याच वेळेला अहिल्यादेवींना त्यांच्या सख्ख्या भावाची आठवण येते. त्यांच्या सख्ख्या भावाने ही मारुतीप्रमाणे त्यांना शेवटपर्यंत साथ देईन असं वचन दिलेलं असतं मात्र कालांतराने असं काहीसं होतं की ते अहिल्यादेवींना घरातून जायला सांगतात आणि तू घरातून गेली नाहीस आणि मला पुन्हा तोंड दाखवलं तर माझं प्रेत पाहशील, असं म्हणतात. या सगळ्या गोष्टी अहिल्यादेवींच्या डोळ्यासमोर येतात आणि त्यांना रडू येत. त्यावेळेला श्रीकांत त्यांना आधार देतो. तर इकडे दिशा व दामिनी यांना बाहेर फिरायला जायचं असतं मात्र तितक्यातच त्यांना रक्षाबंधन सुरु झालं आहे त्यामुळे अहिल्यादेवींनी खाली बोलावलं असल्याचा निरोप येतो. त्यावेळेला दामिनी प्लॅन करते की, आदित्य आणि प्रीतमला घरातील सगळीच नोकर मंडळी आज राखी बांधतात आता आपण प्रिया व पारूलासुद्धा राखी बांधायला सांगूया म्हणजे आपल्या आयुष्यातील काटा कायमचा दूर होईल म्हणून त्या प्रियाला राखी बांधायला सांगतात. तेव्हा प्रिया दामिनीला उत्तर देते की, मी इथे कोणाला भाऊ बनवायला आलेले नाही.
आणखी वाचा – निक्की झाली Bigg Boss Marathi च्या घराची नवी कॅप्टन, अरबाजनेच तिच्याकडे जबाबदारी सोपवली कारण…; मोठा ट्विस्ट
तर आता पारूसमोर सावित्रीने येऊन सांगितलेलं असतं की तुला दामिनी मॅडमने आदित्य व प्रीतम बाबांना राखी बांधायला बोलावलं आहे हे ऐकल्यावर पारू समोर मोठा प्रश्न असतो. सगळेजण जमलेले असतात तेव्हा पारू राखी बांधायला पुढे येते. तेव्हा आदित्य प्रीतमला म्हणतो, पारू तर आपली मैत्रीण आहे ना मग हे बहिणीचं जबरदस्तीचं नातं कशाला हवं, आता पारू आदित्य व प्रीतमला राखी बांधेल का?, हे मालिकेच्या पुढील भागात पाहणं रंजक ठरेल.