शुक्रवार, जुलै 24, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Bigg Boss Marathi : “बोलत नाही तर गरिबांचा फायदा घेतात”, सूरज चव्हाण थेट भिडणार, अभिजीत-आर्याला म्हणाला, “तू नड आता…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 22, 2024 | 11:56 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Bigg Boss Marathi 5 daily update new promo of is out Suraj Chavan support Aarya Jadhav and Abhjeet Sawant

Bigg Boss Marathi 5 मध्ये सूरज चव्हाणचा आर्या अभिजीतला फुल्ल सपोर्ट, “तू नड” म्हणत दिला पाठींबा

Bigg Boss Marathi 5 : ‘बिग बॉस मराठी’चा तिसरा आठवडा गोलीगत सूरज चव्हाणने चांगलाच गाजवला. याबद्दल ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेशने सूरजचं भरभरून कौतुक केला. त्या आठडव्यात सूरज कॅप्टन झालेला नसला तरी त्याने विरुद्ध टीमबरोबर दोन हात केले होते. पहिले दोन आठवडे शांत असणाऱ्या सूरजने तिसऱ्या आठवड्यात कॅप्टनसी टास्कमध्ये चांगलाच धुमाकूळ घातला. प्रेक्षकांनाही त्याचा खेळ आवडला असून, शनिवारच्या ‘भाऊच्या धक्क्या’वर रितेशही त्याचं कौतुक करताना दिसला. सूरजचा या घरात आल्यानंतरचा नवीन स्वॅग पाहायला मिळत आहे. सूरजच्या हळहळू खेळत सहभागी होत असून त्याचा सहभाग सर्वांनाचं आवडत आहे. अशातच त्याच्या नवीन स्वॅगचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे आणि या प्रोमोमध्ये तो आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे. (Bigg Boss Marathi 5 Daily Update)

कलर्स मराठीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक प्रोमो शेअर करण्यात आला आहे, ज्यामध्ये सूरज अभिजीत व आर्याला धीर देताना पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोमध्ये सूरज असं म्हणत आहे की, “जिथे अत्याचार होणार तिथे सूरज चव्हाण उभा राहणार. बोलत नाही म्हणून गरिबांचा फायदा घेतात. निक्कीने केलं तर आपण सहन करून घ्यायचं आणि आर्याने केलं तर…” यापुढे तो असं म्हणतो की, “आपल्या टीमला कुणी काही बोललं तर आपण नडायचं” यापुढे तो आर्याला “तू नड” असंही म्हणतो. त्याचा हा प्रोमो सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे.    

View this post on Instagram

A post shared by Colors Marathi (@colorsmarathi)

आणखी वाचा – Bigg Boss Marathi मध्ये रंगणार नॉमिनेशन टास्क, कोण घराबाहेर जाणार? रंगली चर्चा

सूरजला फक्त त्याच्या प्रेक्षकांकडून, चाहत्यांकडून तसंच कलाकारांकडूनही भरपूर पाठिंबा मिळत आहे. सूरज सध्या ट्रेंडिंगमध्ये आला असून तो कायमच चर्चेत असतो. सुरुवातीच्या काही दिवसांत सूरजला गेम कळला नव्हता, त्यामुळे सूरज थोडासा घाबरायचा. त्याच नीट वागणं, बोलणं प्रेक्षकांना कळत नसेल अशी भीती त्याला वाटत होती. मात्र आता ही त्याची भीती दूर पळाली असून त्याने खेळ खेळायला सुरुवात केली आहे. सूरजने स्वतःचा खेळ खेळायला सुरुवात केली आहे.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुझ्या पातळीला उतरणं माझ्या बाबाला…”, पॅडी कांबळेच्या लेकीने जान्हवीला सुनावलं, निक्कीची सावली आहे असंही म्हणाली अन्…

‘बिग बॉस मराठी’च्या नवीन पर्वात सूरज चव्हाणने सहभाग घेतला आहे. तेव्हापासून त्याच्याबद्दलच्या अनेक आशा-अपेक्षा चाहत्यांकडून वाढल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून सूरजचा या घरातील सहभाग वाढला असून तो आता प्रत्येक कार्यात सहभागी होत आहे. घरातील प्रत्येक टास्कमध्ये तो सहभागी होत असून प्रत्येक मुद्द्यावर तो आपलं मत मांडत आहे. सूरजच्या ‘बिग बॉस’च्या घरातील वावराबद्दल, त्याच्या वागणुकीबद्दल, खेळातील टास्कमधील सहभागाबद्दल त्याचे अनेक चाहते कौतुक करत आहेत.

Tags: Aarya JadhavAbhjeet Sawantbigg boss marathi 5Suraj Chavan
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bhootam Bhayam
Entertainment

‘भूतम भयम्’मध्ये आणखी एक सरप्राईज, प्रियदर्शन जाधव साकारतोय रहस्यमय ‘मया’

जुलै 24, 2026 | 5:20 pm
Bhagyashree Nhavale Periods Awareness
Entertainment

“मी अजूनही बाजूला बसते”, मासिक पाळीबाबत अभिनेत्रीने मांडली तिची बाजू, म्हणाली, “देवाला जाणं…”

जुलै 24, 2026 | 11:11 am
salman khan appeal students at jantar mantar
Entertainment

“कृपया घरी परत जा”, जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलमान खानचे भावनिक आवाहन, म्हणाला, ” पंतप्रधान मोदी…”

जुलै 24, 2026 | 10:15 am
parag tyagi shares simba emotional video
Entertainment

शेफाली जरीवालापाठोपाठ लाडका श्वान सिंबाचे निधन, पतीचा भावुक व्हिडीओ समोर, म्हणाला, “मम्मा एकटी…”

जुलै 23, 2026 | 1:35 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 vishakha subhedar angry post

"खोटे अश्रू, जीभेला आवर घाल आणि…", पॅडीची माफी मागणं जान्हवीचं नाटक म्हणत विशाखा सुभेदारची पोस्ट, म्हणाल्या, "नौटंकी…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.