Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, अहिल्यादेवींनी अखेर प्रिया व प्रीतमचं लग्न लावून दिलेलं असतं. दोघंही उखाणा घेत रीतसर गृहप्रवेश करत असतात. तितक्यातच दामिनी मध्येच थांबवते आणि म्हणते की, सगळंच रीतीनुसार होत आहे तर तुम्ही प्रिया आणि प्रीतम यांची पत्रिका सुद्धा पाहायला हवी, नाहीतर त्यांच्यात भांडण होतील आणि हे प्रकरण घटस्फोटापर्यंत जाईल. प्रिया ही तुमच्या भावाची मुलगी आहे म्हणून तुम्ही हे सगळं करणार नाही हे चुकीचं आहे कारण या प्रियाच्या जागी इतर कोणती मुलगी असती तर तुम्ही पत्रिका नक्कीच पाहिली असती. हे ऐकल्यावर अहिल्यादेवी दामिनीला तिच्याच भाषेत उत्तर देत म्हणतात की, प्रीतमने कोणत्याही मुलीशी लग्न केलं असतं तरी सुद्धा मी तिचं इतक्याच जोरदार स्वागत केलं असतं कारण प्रीतमची पसंती ही माझी पसंती आहे असं म्हणत त्या प्रियाला गृहप्रवेश करायला सांगतात.
गृहप्रवेश करुन घरात आल्यानंतर ते सगळेजण देवी आईचे दर्शन घेतात. यावेळेला सगळेजण आपापल्या मनातील मनोकामना देवीसमोर बोलून दाखवतात, तर प्रिया व प्रीतम सर्वांच्या पाया पडत असतानाच दामिनीच्या पाया पडताना दामिनी प्रियाला सासू असल्याचा सल्ला देते आणि सासू आणि सूनेने कसे राहायला पाहिजे हे शिकवते. हे ऐकून सगळेचजण तिच्याकडे पाहू लागतात तर यावर दामिनी विषय फिरवत म्हणते की, मी तर गंमत करत होते,वातावरण हलक व्हायला. त्यानंतर सगळेच जण आपापल्या खोलीत जातात तेव्हा अहिल्यादेवी सांगतात की दोन दिवस पुढचे कार्यक्रम होईपर्यंत प्रिया आणि प्रीतम एकत्र राहणार नाहीत. या वेळेला पारू प्रियाला खोलीत घेऊन जाते तर आदित्य प्रीतमला खोलीत घेऊन जातो.
खाली येत असतानाच प्रिया व प्रीतम आदित्य व पारुला समोर उभं करुन त्यांच्या सुद्धा पाया पडतात, मात्र ते त्यांना अडवत सांगतात की, तुमचं लग्न झालं हेच आमच्यासाठी खूप आहे. प्रीतम -प्रिया पारू आदित्यचे खूप आभार मानतात की हे तुमच्यामुळे शक्य झालं. हे ऐकल्यानंतर सगळेच जण आपापल्या खोलीत जातात तेव्हा आदित्य असा विचार करतो की, पारुन इतकं सगळं आपल्यासाठी केलं आहे तर तिला काहीतरी खास भेट म्हणून द्यायलाच हवी. तितक्यातच पारू आदित्यच्या खोलीत येते आणि आदित्य पारूला घट्ट अशी मिठी मारतो आणि सांगतो की, शेवटी तुझ्यामुळे हे सगळं काही शक्य झालं, सांग तुला काय भेट हवी आहे?, यावर पारू सांगते की, मला काहीच नकोय. तेव्हा आदित्य सांगतो की, तुला काहीतरी घ्यावंच लागेल माझ्याकडून एखादी छोटीशी खास भेट.
मात्र पारू त्याला काय भेट हवी हे सांगतच नाही. आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, आदित्य गाणं गुणगुणत असतो आणि आदित्य कुठेतरी पारूच्या प्रेमात पडलेला असतो. तो पारुला छान अशी पैंजणही गिफ्ट करतो. आदित्य पारूच्या प्रेमात पडला हे त्याला कळेल का?, पारू वरील प्रेम तो सर्वांसमोर कबूल करेल का?, हे सर्व पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.