बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘आई कुठे…’ फेम सुप्रसिद्ध अभिनेत्रीची राजकारणात एन्ट्री, शरद पवार गटात केला प्रवेश, म्हणाली, “पक्षाने जबाबदारी दिली तर…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑक्टोबर 17, 2024 | 9:37 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aai Kuthe Kay Karte serial fame actress Ashwini Mahangde joined Sharad Pawar Nationalist Congress Party see the details

आई कुठे काय करते मालिका फेम अश्विनी महांगडेने शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे

महाराष्ट्रात नुकतेच विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. यामुळे सगळेच राजकीय पक्ष तयारीला लागलेत. निवडणूकांच्या आधी राजकीय पक्षांत प्रवेश केला जातो. काही दिवसांपूर्वी दक्षिण व मराठीतील सुप्रसिद्ध अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला. अशातच एका लोकप्रिय अभिनेत्रीनेही नुकतीच राजकारणात एन्ट्री केली आहे आणि ही लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. ‘आई कुठे काय करते’ व ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका फेम अश्विनी महांगडेने नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार गटात प्रवेश केला आहे. (Ashwini Mahangade Politics Entry)

अश्विनी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असून तिने तिच्या सोशल मीडियाद्वारे अनेकदा सामाजिक व राजकीय मुद्द्यांवर आपली मतं मांडली आहेत. यामुळे तिच्या राजकारणातील प्रवेशाबद्दल बऱ्याच चर्चा होत होत्या आणि या चर्चा अखेर खऱ्या ठरल्या आहेत. अश्विनीला शरद पवार गटात महाराष्ट्र राष्ट्रवादी महिला कार्यकारिणीचं उपाध्यक्षपद देण्यात आलं आहे. साताऱ्यातील वाई इथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेच्या मेळाव्यात अश्विनीने पक्षप्रवेश केला आहे. यावेळी जयंत पाटील, अमोल कोल्हे व बाळासाहेब पाटील हे देखील उपस्थित होते.

View this post on Instagram

A post shared by Asʜvɪɴɪ Pʀᴀᴅɪᴘᴋᴜᴍᴀʀ Mᴀʜᴀɴɢᴀᴅᴇ (@ashvinimahangade)

आणखी वाचा – 17 October Horoscope : मेष, सिंह व कुंभ राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस कसा असेल, जाणून घ्या…

याबद्दल अश्विनीने सोशल मीडियावर खास फोटो शेअर केले असून तिने एक पोस्टही लिहिली आहे. यात तिने असं म्हटलं आहे की, “माझे वडील स्व. प्रदीपकुमार महांगडे (नाना) यांनी कायम मा. शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केले. अगदी गावातल्या निवणुकांपासून ते लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या काळात अगदी झोकून देऊन ते काम करायचे. जेवायला बसल्यावर चर्चासुद्धा त्याच. राजकारण हा त्यांचा आवडता विषय. लोकांच्या मदतीला धावून जाणे हे त्यांच्या रक्तातच होते. त्यांना कायम कार्यकर्ता बनून राहायला आवडायचे”.

आणखी वाचा – KBC मध्ये ५० लाखांसाठी सांगलीच्या मुलाला विचारण्यात आला ‘तो’ प्रश्न, पण दिलं चुकीचं उत्तर, तुम्हाला उत्तर माहित आहे का?

यापुढे तिने म्हटलं की, “पण साधारण ४ वर्षांपूर्वी त्यांना जाणवले की ताई (मी) समाजासाठी काम करू शकते, त्यांच्यासाठी उभी राहू शकते आणि पक्षाने जबाबदारी दिली तर काम करण्याचा आवाका वाढेल. हे त्यांचे स्वप्न अर्थात ४ वर्षानंतर कोजागिरी पौर्णिनेच्या मुहूर्तावर पूर्ण झाले. ही नवीन जबाबदारी मला अजून घडवेल. समाजासाठी काम करायची जाणीव सतत करून देईल. स्वीकारलेले काम जबाबदारीने पूर्ण करण्याचा प्रयत्न मी नक्की करेन. यात अनेक लोकांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा होत्या म्हणून हे शक्य झाले. त्यांचे आभार”.

Tags: Ashwini Mahangade Politics EntryAshwini Mahangade Politics Entry NewsAshwini Mahangade Sharad Pawar Party Entry
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Paaru Marathi Serial Update

Paaru Marathi Serial : पारूच्या प्रेमात पडला असल्याचं आदित्यला कळेल का?, एकमेकांवरील प्रेमाची कबुली देणार का?, मोठं वळण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.