Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, पारू आदित्यची बॅग भरत असते आदित्यला पुरस्कार घेण्यासाठी जावं लागत असल्याने ती त्याची संपूर्ण तयारी करत असते. तेव्हा आदित्य तिथे येतो आणि विचारतो, ‘काय करतेस’. यावर पारु आदित्यला सांगते की, ‘मी तुमची बॅग भरतेय आणि मी सगळं काही व्यवस्थित भरुन ठेवलं आहे. तुम्ही सतत विसरत असता म्हणून मी सगळं काही केलं आहे’. यावर आदित्य पारुला थांबवतो आणि म्हणतो की, ‘तू मला या सगळ्याची सवय लावू नको. हे सगळं काही तू तुझ्या नवऱ्यासाठी केलं पाहिजे कारण माझी बायको म्हणजेच अनुष्का हे सगळं माझ्यासाठी करेलच असं नाही त्यामुळे मला तू तुझी सवय लावू नको. तू नसशील तेव्हा मग मला तुझी आठवण येईल म्हणजेच अनुष्का माझी बायको असतानाही मला तुझी आठवण आली तर ते कसं चालेल’, असं म्हणतो.
तेव्हा पारूच्या डोळ्यात अश्रू येतात. तेव्हा आदित्य तिला समजावण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर पारू तिच्या घरी जायला निघते. त्याच वेळेला दामिनी मारुतीच्या मनात विष कालवते आणि सांगते की, नोकरदारांनी मालकांशी प्रामाणिकच असायला हवं. बघ या पेपरमध्ये एक बातमी आली आहे नोकराच्या मुलाने मालकांचा घात केला. यावर दामिनी मारुतीला पटवून देते की, तुझी लेक सुद्धा आमच्या घरात असंच काही करेल’. तर यावर मारुती पेटून उठतो आणि म्हणतो की, ‘माझ्या पारूने असं काही केलं तर मी तिचा जीवच घेईन’. यावर दामिनी त्याला पाठिंबा देते. शिवाय दामिनी, ‘मोठ्या माणसांच्या मुलांचं काही खरं नसतं आणि तुमच्यासारख्या नोकरदारांच्या मुलींना प्रेम मिळत गेलं की त्या वाहवत जातात’, असंही बोलते. हे ऐकून मारुतीच्या मनात आदित्य व प्रीतम बद्दल शंका निर्माण होते. त्यानंतर पारू घरी येते तेव्हा मारुती पारुला थांबवत विचारतो, ‘कुठे गेली होतीस’. तेव्हा पारू सांगते की, ‘मी आदित्य सरांची बॅग भरत होते’.
यावर मारुती पारुला ओरडतो आणि सांगतो की, ‘त्यांना त्यांची बारीक सारीक काम आहेत ती स्वतःची स्वतः कऱ्य दे. तू त्यांना सवय लावू नको’, मारुती असं का बोलतोय पारुला कळतच नाही. त्यानंतर पारू सांगते की, ‘मी सुद्धा माझी बॅग भरते कारण मला सुद्धा पुरस्कार घोषित झाला आणि तो घ्यायला जायचं आहे’. यावर मारुती पारूला थांबवतो आणि सांगतो की, ‘तू कोणताही पुरस्कार घ्यायला जायचं नाही आणि आपण उद्याच्या उद्या गावी चाललो आहोत, त्यामुळे तू हा पुरस्कार घ्यायला जाऊ शकत नाहीस’. यावर पारू विचारते पण आदित्य सरांना आणि काय सांगू. यावर मारुती सांगतो की, ‘बाने नकार दिला आहे असं सांग’. त्यानंतर प्रीतमला कळतं की, पारू पुरस्कार घेण्यासाठी येणार नाहीये तेव्हा तो तात्काळ जाऊन आदित्यला ही गोष्ट सांगतो. पारूला आदित्यच्या ब्लेझरला कुरवळताना अनुष्का अनुष्का बाहेरून पाहते. हे पाहून अनुष्काचा राग अनावर होतो. तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते. ती याबद्दल विचार करत असते तेव्हा दामिनी येऊन आणखीनच त्यात तेल ओतते. प्रीतम ही गोष्ट आदित्यला सांगतो तेव्हा आदित्यला खूप मोठा धक्का बसतो.
आणखी वाचा – बेपत्ता कॉमेडियन सुनील पाल सापडताच पत्नीचं भाष्य, पत्रकार परिषद घेत करणार मोठा खुलासा, नेमकं प्रकरण काय?
आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, आदित्य मारुतीजवळ जातो आणि सांगतो की, असं काय आहे ज्यामुळे तू पारूला आमच्याबरोबर पुरस्कार घेण्यासाठी पाठवत नाहीयेस. आता मारुती यावर काय उत्तर देणार. शिवाय प्रीतमही आदित्यला म्हणतो की, अनुष्का येणार नाही याचा तुला तितकास फरक पडला नाही पण पारू येणार नाहीये म्हटल्यावर तुला खूप फरक पडला त्यामुळे तुमचं नक्कीच काहीतरी कनेक्शन आहे हे देखील अनुष्का ऐकते आता पारू पुरस्कार घ्यायला जाणार का हे सारं पाहणं मालिकेच्या येणाऱ्या भागात रंजक ठरेल.