मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळी आपल्या स्वप्नपूर्तीसाठी झटत असतात. नवीन घर, नवीन गाडी किंवा नाविन्यपूर्ण गोष्टी करण्यासाठी ही मंडळी मेहनत घेत असतात आणि त्यांची स्वप्नपूर्ती होताच ते आपला आनंद सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत असतात. असाच नवीन गाडीचा आनंद एका अभिनेत्याने शेअर केला आहे आणि हा अभिनेता म्हणजे स्वप्नील जोशी. मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे स्वप्नील जोशी. स्वप्नीलने आजवर अनेक रोमँटिक चित्रपटात काम केलं आहे. (Swapnil Joshi bought new car)
आपले चित्रपट व त्यातील भूमिकांमुळे कायम चर्चेत असणारा हा अभिनेता नुकताच एका कारणामुळे चर्चेत आला आहे आणि या चर्चेचं कारण म्हणजे अभिनेत्याने नुकतीच एक महागडी आलिशान कार खरेदी केली आहे. २०२४ हे वर्ष संपायला आता अवघे मंगळवारी सायंकाळी (३ डिसेंबर) नवीन कारची पहिली झलक आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करत त्याने. “तर, आज ही खास गोष्ट घडली. डिफेंडर… माझी नवीन गाडी, स्वप्नपूर्ती” असं कॅप्शन देत त्याने हे फोटो शेअर केलेत.
त्याचबरोबर त्याने एक खास व्हिडीओ शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “बाबांना आमच्या नवीन गाडीच्या चाव्या मिळाल्याचे पाहून माझे हृदय खूप अभिमानाने आले. माझ्यासाठी ही फक्त एक कार नाही… ती प्रत्येक गोष्टीचे प्रतीक आहे ज्यावर आम्ही आमच्या मात केली आहे.मी जो कुणी आहे तो आईबाबांमुळे आहे, त्यामुळे हे एक स्मरणपत्र आहे की एखादी गोष्ट कितीही अशक्य वाटली तरीही तुम्ही तुमच्या धैर्याने, उत्कटतेने आणि तुमच्या प्रियजनांसह ते मिळवू शकता” असं स्वप्नीलने म्हटलं आहे.
यापुढे त्याने असं म्हटलं आहे की, प्रिय आयुष्य… ही तर फक्त सुरुवात आहे!! मला माहित आहे की या प्रवासात अनेक चढ-उतार आले आहेत… पण आमची कहाणी एक महान आहे आणि माझा विश्वास आहे की, आयुष्य मला दररोज प्रेरणा देतं आणि मला नम्रतेने जगायला शिकवतं. तसंच या मार्गावर चालताना मला खूप धन्य वाटते” दरम्यान, स्वप्नीलने ही महागडी कार घेताच त्याच्यावर मराठी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार मंडळींनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसच स्वप्नीलच्या अनेक चाहत्यांनीही अभिनेत्याचे कौतूक केलं आहे.