Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत खूप मोठा ट्विस्ट आलेला पाहायला मिळत आहे. मालिकेत वीस वर्षांपूर्वी भावा बहिणीची झालेली ताटातून आता पुन्हा एका नव्या बंधात अडकताना दिसली. पारूमुळे सयाजीराव व अहिल्यादेवी पुन्हा एकत्र आल्याचे पाहायला मिळालं. मालिकेत प्रिया व प्रीतमच्या लग्नाला सयाजीराव अहिल्यादेवींनी संमती दिली आणि दोघांचं लग्न निर्विघ्नपणे पार पडलेलं पाहायला मिळालं. अखेर या सगळ्याच श्रेय पारूला मिळालं. मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, सयाजीराव अहिल्यादेवींना प्रियाला सांभाळशील का?, असं विचारतात. यावर अहिल्यादेवी होकार देतात त्यानंतर प्रीतमच्या हातात प्रियाचा हात देतात आणि सांगतात की, तू म्हणाली होतीस ना माझा हात तुम्ही स्वतः प्रीतमच्या हातात द्याल आणि त्याप्रमाणे मी तुझा हात प्रीतमच्या हातात दिला आहे.
त्या वेळेला अहिल्यादेवी घोषणा करतात की, मी शब्द देते की प्रीतम व प्रियाचं लग्न आज या किर्लोस्कर घरात होईल आणि त्यानुसार त्या पारूला प्रियाला तयार करण्याची जबाबदारी सोपवतात. पारू प्रियाला तयार करुन घेऊन येते आणि त्यानंतर प्रीतम व प्रियाचं निर्विघ्नपणे लग्न लागतं. सगळ्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतर सगळेजण खूप खुश असतात. त्यानंतर सयाजीराव लेकीला दिल्या घरी सुखी पाहून गावाकडे जाण्याचं ठरवतात.
याच वेळेला अहिल्यादेवी त्यांना थांबवतात आणि म्हणतात की, तुम्ही इतक्या वर्षांनी माझ्या घरी आला आहात आणि मी तुम्हाला असं सहजासहजी जाऊ देणार नाही. यावर सयाजीराव अहिल्यादेवींना सांगतात की, बहिणीचं घर म्हणून एक वेळ मी इथे राहिलो सुद्धा असतो पण आता हे फक्त माझ्या बहिणीचं घर नाहीये तर हे माझ्या मुलीचं सासर आहे आणि सासरी मुलीच्या बापानं राहायचं नसतं असं म्हणत ते निरोप घेतात. त्यानंतर किर्लोस्कर कुटुंबाच्या रीतीनुसार प्रीतम आणि प्रियाचा गृहप्रवेश होताना पाहायला मिळतो. दोघांनाही उखाणे घ्यायला लावले जातात.
आणखी वाचा – सुशांत सिंह राजपूतच्या घरी भाड्याने राहते अदा शर्मा, मात्र तिथे जाणवते भीती?, म्हणाली, “भीतीपोटी प्रश्न…”
मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, दोघेही घरात गृहप्रवेश करणार इतक्यातच दामिनीमध्ये खोडा घालते आणि म्हणते की, किर्लोस्करांची सून या घरात प्रवेश करण्याआधी प्रिया व प्रीतम यांची लग्न पत्रिका जुळते की नाही हे पाहायला हवं. उद्या जर जाऊन त्यांची खूप मोठी भांडण झाली आणि हे प्रकरण घटस्फोटापर्यंत गेलं तर असं म्हणत त्यांना ती तिथेच थांबवते. आता या सगळ्याला अहिल्यादेवी काय उत्तर देणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेल.