Myra Vaikul Brother : ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून परीच्या भूमिकेतून घराघरांत पोहोचलेली बालकलाकार म्हणजे मायरा वायकुळ. या मालिकेमुळे मायराला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मालिकेबरोबरच मायरा सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेनंतर मायरा ‘नीरजा: एक नयी पहचान’ मधून हिंदी मालिकाविश्वातून प्रेक्षकांच्या भेटीस आली. इतकंच नव्हे तर परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा’ चित्रपटातही दिसली. सोशल मिडियावर मायरा व तिचं कुटुंब सक्रिय असतात.
गेल्या ९ एप्रिलला त्यांनी सोशल मीडियावरुन फोटो शेअर करत चाहत्यांसह आनंदाची बातमी शेअर केली. मायरा वायकुळने मोठी ताई होणार असल्याचं यावेळी जाहीर केलं होतं. त्यानंतर अखेर वायकुळ कुटुंबात एका गोंडस बाळाचं आगमन झालं. “आमचा छोटा सुपरहिरो आला आहे. आमच्या बाळाला हॅलो म्हणा”, अशी पोस्ट करत मायराने आनंदाची बातमी दिली.
यानंतर आता मायराने इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधलं आहे. या पोस्टमध्ये मायराने तिचा भाऊ एक महिन्याचा झाला असल्याचं सांगितलं आहे. मायराच्या भावाला आता एक महिना पूर्ण होताच त्यांनी त्याचा व त्याच्याबरोबरचा फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्यांनी चिमुकल्याचा चेहरा दाखवलेला नाही. तर चौघांचा हे छोटंसं कुटुंब खूप आनंदी असलेलं पाहायला मिळालं.
आणखी वाचा – लोकप्रिय ‘सीआयडी’ मालिका आता मराठीमध्ये येणार, नवीन प्रोमो समोर, उत्सुकता शिगेला
काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमधून घरी चिमुकल्याला घरी आणतानाचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला होता. यावेळी मायरा तिच्या आई-वडिलांसह तिच्या चिमुकल्या भावाला हॉस्पिटलमधून घरी घेऊन येताना दिसली. घरी घेऊन येताना त्यांचं संपूर्ण एकत्र कुटुंबं खूप खुश दिसले. घरी आल्यावर चिमुकल्याचं औक्षण करत त्यांनी त्याच स्वागत केलं. यावेळी फुलांच्या पायघड्याही घातलेल्या पाहायला मिळाल्या. शिवाय घरात फुग्यांच्या डेकोरेशननेही साऱ्यांचं लक्ष वेधलं. यानंतर आता मायराच्या भावाला एक महिना पूर्ण होताच शेअर केलेल्या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाईक्स व कमेंटचा वर्षाव केलेला पाहायला मिळत आहे.