Paaru Marathi Serial Update : पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, आदित्यसाठी ताराच स्थळ सांगून आलेलं असतं. मात्र, हे लग्न होऊ नये असं पारुला मनोमनी वाटत असतं. त्याच वेळेला पारूची मैत्रीण सावली ही पारूच्या मदतीला धावून येते. पारुने मंगळसूत्राचं सत्य सावलीला सांगितलं असल्याने सावली देखील पुढाकार घेत अहिल्या देवींना सर्व सत्य सांगून हे लग्न मोडण्याचा निर्णय घेते. लग्न जुळवण्यासाठी सगळेजण जमलेले असतात तेव्हा एकमेकांचा होकार आल्यानंतर अहिल्यादेवी प्रियाला मिठाई आणायला सांगतात. त्यावेळेला प्रिया मिठाई घेऊन येते तेव्हा ती काळी साडी नेसून येते हे पाहून या शुभकार्यात अशुभ रंगाचा कुठेही वापर होता कामा नये असं मुलीकडचे लोक म्हणतात. हे ऐकून अहिल्यादेवी त्यांना तिथेच थांबवते आणि सांगते की, रंगाने कोणताच फरक पडत नाही पण तसेच काही असेल तर मी स्वतः मिठाई देते, असं म्हणून त्या किचनमध्ये मिठाई आणायला जातात. त्याच वेळेला तिथे सावली अहिल्यादेवींना गाठते आणि सगळं काही सत्य सांगते. यावर अहिल्यादेवी सावलीच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहतात आणि सांगतात की, आत्ताच्या आता काय तो सोक्षमोक्ष लावून टाकूया आणि मी तुझ्या पाठीशी उभी आहे.
मात्र सावली अहिल्यादेवींना थांबवत सांगते की, ही लढाई माझी आहे त्यामुळे ही लढाई मलाच लढायला हवी. मला यात कुणाचीही मदत नको आहे. माझ्या वाटेला जी संकट आहेत ती पार करुन मी ही लढाई लढेल आणि हा स्वाभिमान मी कायम बाळगीन असं म्हटल्यावर अहिल्यादेवींचं सावली मन जिंकून घेते. अहिल्यादेवी बाहेर येऊन ताराला गाणं द्यायला सांगतात तेव्हा तारा मुद्दाम चक्कर येण्याचं नाटक करते हे पाहून अहिल्यादेवींची खात्री पटते की, तारा ही खोटं बोलत आहे. त्यानंतर अहिल्यादेवी स्वतःच सगळ्यांसमोर सांगतात की, हे लग्न आता होऊ शकत नाही यासाठी काही कारण आहे ते मी आता कोणाला सांगू शकत नाही. मात्र योग्य वेळ आली की मी ते कारण तुम्हाला सांगेनच.
ताराच्या आईचा खूप मोठा अपमान झालेला असतो त्यामुळे त्या याचा बदला घेईन, असं म्हणत तिथून निघून जातात. तर एकीकडे पारू व सावलीमुळे आदित्यचं आयुष्य उध्वस्त होता होता वाचलेला असतं त्यामुळे अहिल्यादेवी दोघींचेही खूप आभार मानतात. मालिकेत दिवाळी विशेष भाग पाहायला मिळत असल्याने प्रिया प्रीतमला अहिल्यादेवी श्रीकांतला आणि दामिनी मोहनला उठणं लावून अभ्यंग स्नान घालत असतात. त्याच वेळेला अहिल्यादेवींची तब्येत बिघडते आणि त्यांना चक्कर येते. तेव्हा घरातील सगळेजण काळजी व्यक्त करतात.
आणखी वाचा – प्रसिद्ध दिग्दर्शकाचा धक्कादायक मृत्यू, घरात कुजलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह, नेमकं काय झालं?
आता मालिकेच्या पुढील भागात असं पाहायला मिळणार आहे की, आदित्य इकडे ऑफिसच्या महत्त्वाच्या मिटींगला गेलेला असतो त्यामुळे दामिनी ती संधी साधून प्रियाच्या मनात त्याबद्दल विष कालवते आणि सांगते की, प्रीतमला अशा कोणत्या संधी चालून येत नाहीत. सगळं काही इथे आदित्यच्या नावावर आहे त्यामुळे तू तुझा अधिकार गाजवायला शिक आणि तू वेळीच योग्य तो तुझा मान घ्यायला शिक. प्रियाच्या मनात दामिनी विष कालवते आता प्रिया यावर काय प्रतिक्रिया देणार हे सारं पाहणं रंजक ठरेल.