Hruta Durgule On Wedding : आजवर मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्री ऋता दुर्गुळेने तिच्या सौंदर्याने भुरळ घातली. सौंदर्याबरोबरचं ऋताच्या अभिनयाचेही लाखो चाहते दिवाने आहेत. कायम चर्चेत असणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीत ऋताचं नाव आवर्जून घेतलं जातं. ‘फुलपाखरु’ मालिकेतून ऋता घराघरांत पोहचली. तर ‘मन उडू उडू झालं’ मालिकेतील तिची भूमिका चांगलीच गाजली. ‘महाराष्ट्राची क्रश’ म्हणून ऋताला ओळखले जाते. मराठी चित्रपटांबरोबरचं ऋताने हिंदी सिनेसृष्टीतही महत्त्वपूर्ण कामगिरी केली आहे.
करिअरच्या उंच शिखरावर असताना हृताने लग्नाचा निर्णय घेतला आणि सगळ्यांच्या भुवया उंचावल्या. २०२२ मध्ये हृताने प्रतीक शाहशी लग्नगाठ बांधली आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला.अनेक तरुणांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री हृता दुर्गुळे लग्नबंधनात अडकली आहे. हृताने बॉयफ्रेंड प्रतिक शाहसह १८ मे रोजी लग्न केलं आहे. सध्या या दोघांच्या लग्नाचे फोटो चर्चेचा विषय ठरले.
आणखी वाचा – पाच महिन्यांनी वरुन धवनने केला लेकीच्या नावाचा खुलासा, नावही आहे अगदी युनिक, म्हणाला…
जवळचे कुटुंबीय आणि मित्रपरिवारांच्या उपस्थितीत हृता आणि प्रतिकचं लग्न पार पडलं. तिच्या या खास दिवसाचे काही फोटो शेअर करत तिनं लग्नाची बातमी दिली आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांसह मनोरंजनविश्वातील कलाकारांनीदेखील शुभेच्छांचा वर्षाव केला. यानंतर आता ऋता व प्रतिकच्या लग्नाला जवळपास दीड वर्ष पूर्ण झालं आहे. यानंतर आता ऋताने लग्नाबाबत केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे. हृताने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत लग्न करताना मुलींनी मुलांमधील कोणते गुण पाहावेत याबाबत भाष्य केलं आहे.
आणखी वाचा – अमृता खानविलकरने मुंबईत खरेदी केलं आलिशान घर, दिवाळीनिमित्त दाखवली घराची झलक, कलाकारांकडून कौतुक अन्…
अभिनेत्री ऋता दुर्गुळेने नुकतीच ‘द मोटर माऊथ शो’ या यूट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. या मुलाखतीत ऋताला असे विचारण्यात आले की, “मुलींनी लग्न करताना मुलातील कोणते गुण पाहावे?”. या प्रश्नाचं उत्तर देत ऋता म्हणाली, “मला वाटते की नात्यात आदर असणे महत्त्वाचे आहे. प्रेम वगैरे ठीक आहे, ते होतं. पण, सन्मान खूप महत्त्वाचा आहे. जितके त्याला त्याच्या कामाप्रति आदर असेल, तितकाच मुलीच्या कामाप्रतिदेखील असायला हवा. याबरोबरच निर्णय घेण्याच्या बाबतीतसुद्धा अगदी छोट्या छोट्या गोष्टीतसुद्धा काय वाटते हे महत्त्वाचे आहे. मुलीचे मतदेखील तितकेच महत्वाचे आहे”.