Paaru Marathi Serial Update : ‘पारू’ या मालिकेत असं पाहायला मिळत आहे की, इकडे दिशा व दामिनीने प्लॅन केलेला असतो की काही झालं तरी पारू, प्रिया व प्रीतमला धडा शिकवायचा. प्रीतम ऑफिसला जायला निघतो तेव्हा पारूच्या सांगण्यावरुन प्रिया सुद्धा त्याच्याबरोबर जात असते. प्रीतम ऑफिसला जाणार इतक्यात प्रिया सुद्धा त्याच्या मागून जाताना दिसते आणि दिशा तिला थांबवते आणि सांगते की, आज प्रीतमची मिटिंग आहे त्यामुळे तिथे तुझी काहीच गरज नाही आहे. तू त्याच्याबरोबर गेलंच पाहिजे असं काहीच नाही. त्यामुळे तू इथेच थांब त्याला एकट्याला जाऊ दे. हे ऐकल्यावर प्रिया नकार देते आणि सांगते की, मी सुद्धा प्रीतम सरांबरोबर जाणार तेव्हा दिशाचा पारा चढतो आणि दिशा सांगते तू एक नोकर आहेस त्यामुळे तू आमच्या मध्ये बोलायचं सोडून दे.
तेव्हा प्रिया सुद्धा दिशाचा पाणउतारा करत म्हणते की, मी तुमचं का ऐकू. हे ऐकल्यावर दिशाच राग अनावर होतो आणि दिशा प्रियाच्या कानाखाली मारायला जाते. इतक्यात दिशाचा हात प्रिया पकडते आणि तो हात ती पीरघळते. तेव्हा दिशाला खूप दुखू लागत आणि ती जोर जोरात ओरडू लागते. तर दामिनी ओरडत अहिल्यादेवी व श्रीकांतला बाहेर बोलावून घेते. अहिल्यादेवी प्रिया दिशाचा हात पिरघळताना बघतात आणि प्रियाला ओरडतात की तुझी हिम्मत कशी झाली दिशाच्या अंगाला हात लावण्याची. आत्ताच्या आत्ता तू इथून निघून जा. मला तू आमच्या कंपनीत आणि घराच्या आजूबाजूला सुद्धा नको आहेस, असं म्हणून त्या राग व्यक्त करतात आणि प्रियाला जायला सांगतात.
तर इकडे प्रिया व दामिनी खूप खुश असतात की प्रियाला इथून घराबाहेर पडावे लागले लागलं आहे. त्यानंतर प्रीतमला सोडून प्रियाला कुठेही जायचं नसतं त्यामुळे दोघांमधील हा दुरावा अबोल राहतो. तर इकडे पारू आदित्यला भेटायला येते आणि सांगते की तुम्ही प्रीतम सरांबरोबर जा मला असं सारख वाटतंय की आज काहीतरी वाईट होणार आहे. यावर आदित्य सांगतो की, पण मीटिंग त्याची आहे त्याला जाऊ दे. आताही तो काहीतरी येऊन दिशा बरोबर लग्न न करण्याचा माझ्यासमोर बोलून गेला असंही आदित्य सांगतो. तेव्हा आदित्य पारूला प्रीतमला समजावण्याची जबाबदारी सोपवतो.
तर इकडे प्रीतमला दिशाच्या मित्राचा फोन आलेला असतो त्याला भेटायला म्हणून तो जातो तेव्हा त्यांचे फोटो दाखवण्याच्या नादात तो प्रीतमला दारू पाजतो आणि ऑफिसला पाठवून देतो. ऑफिसला आल्यानंतर नशेतच प्रीतम ऑफिसला येतो आणि हे पाहून अहिल्यादेवी त्याच्या सणसणीत कानाखाली लगावतात. एकूणच दिशाचा हा डाव यशस्वी झालेला असतो. आता प्रीतमला या सगळ्यातून कोण बाहेर काढणार हे पाहणं रंजक ठरेल.