बुधवार, एप्रिल 22, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आपल्याकडे लोक मॅनेज होतात आणि…” Worli Hit And Run Case प्रकरणाबाबत जयवंत वाडकरांचा मोठा खुलासा, म्हणाले, “ढसाढसा रडलो कारण…”

Saurabh Moreby Saurabh More
ऑगस्ट 24, 2024 | 7:01 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Worli Hit And Run Case प्रकरणात कुटुंबाला मॅनेज केलं, जयवंत वाडकरांचा मोठा खुलासा, म्हणाले, "खूप वाईट वाटलं पण..."

Worli Hit And Run Case प्रकरणात कुटुंबाला मॅनेज केलं, अभिनेते जयवंत वाडकरांचा खुलासा

Worli Hit And Run Case : काही दिवसांपूर्वी ‘वरळी हिट अँड रन’ प्रकरणामुळे संपूर्ण मुंबई हादरुन गेली होती. दक्षिण मुंबईतील वरळी परिसरात बीएमडब्ल्यू कारने धडक दिल्यामुळे या अपघातात ४५ वर्षीय कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती ५० वर्षीय प्रदीप नाखवा हे गंभीर जखमी झाले. तपासानंतर शिवसेनेच्या शिंदे गटाचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा मिहीरचा यामध्ये सहभाग असल्याचं समोर आलं. ७ जुलै रोजी पहाटेच्या सुमारास वरळीतील अट्रिया मॉलजवळ ही घटना घडली होती. यावेळी नाखवा दाम्पत्य दुचाकीवरुन प्रवास करत होतं. ससून डॉक परिसरातून मासे विकत घेऊन ते दोघंही घरी जात होते. यादरम्यान भरधाव वेगाने आलेल्या बीएमडब्ल्यू गाडीने नाखवा यांच्या दुचाकीला धडक दिली. या भीषण अपघातामध्ये प्रदीप नाखवा बचावले. परंतु, त्यांच्या पत्नी कावेरी नाखवा यांचा मृत्यू झाला. (Jaywant Wadkar on Worli Hit and Run Case)

या घटनेत मृत पावलेल्या कावेरी नाखवा या मराठी कलाविश्वातील ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांच्या सख्ख्या पुतणी होत्या. सख्ख्या पुतणीच्या अपघाती निधनाने जयवंत वाडकर यांना अतीव दु:ख झाले होते. या घटनेनंतर जयवंत वाडकरांनी आरोपीला शिक्षा देण्याची मागणी केली होती. अशातच जयवंत वाडकरांनी नुकतीच ‘इट्स मज्जा’च्या ‘मज्जाचा अड्डा’वर हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं. तसंच या मुलाखतीत जयवंत वाडकरांनी आरोपीच्या कुटुंबियांकडून त्यांच्या पुतणीच्या घरच्यांना मॅनेज केलं गेलं असल्याचाही खुलासा केला.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “तुम्ही हलक्या कानाचे आहात”, जान्हवीपाठोपाठ रितेश देशमुखने निक्कीलाही सुनावलं, म्हणाला, “चावीचं माकड…”

याबद्दल जयवंत वाडकरांनी असं म्हटलं की, “अपघात होताच मला माझ्या काही वकील मित्रांनी फोन करून धीर दिला होता. तसंच यात त्यांना शिक्षा मिळालीच पाहिजे असा विश्वासही त्यांनी मला दिला. माझ्या पुतणीचं बारावं झाल्यानंतर माझ्या वकील मित्राने पुतणीच्या नवऱ्याला भेटायला बोलावलं होतं. त्यावेळी मी नाटकाच्या दौऱ्यानिमित्त पुण्याला जात होतो. तेव्हा मी पुतणीच्या नवऱ्याला माझ्या मित्राला जाऊन भेट असं सांगितलं. यावर पुतणीच्या नवऱ्याने मला “मी फोन केल्याशिवाय तू काहीही करु नकोस” असं सांगितलं. पुण्यात गेल्यानंतर मी पुन्हा त्याला फोन लावला तर मला त्याच्याकडून तेच उत्तर मिळालं”.

आणखी वाचा – “बेडरुममध्ये बोलावत अयोग्यरित्या स्पर्श केला अन्…”, सुप्रसिद्ध अभिनेत्रीचा दिग्दर्शकावर गंभीर आरोप, म्हणाली, “मी घाबरुन…”

यापुढे त्यांनी असं सांगितलं की, “यामुळे मी संपलो. माझा मूलगा माझ्याबरोबर होता. तेव्हा मी ढसाढसा रडलो. यामुळे मला असं वाटलं की, इतकी मेहनत करुन मग काय झालं? मला माहीत नाही नेमकं काय झालं? पण मी त्याच्या फोनची वाट बघत आहे. कारण त्याच्या सहीशिवाय काहीही होऊ शकत नाही. लोक आपल्याकडे मॅनेज होतात. त्यामुळे खूप वाईट वाटतं. पण तरी माझा चार सिंहांवर (न्यायव्यवस्थेवर) विश्वास आहे. त्यांना कधीना कधी हे भोगावं लागणार आहे. त्यांनी जे काही केलं आहे, त्याची किंमत त्यांना इथेच भोगावी लागणार आहे. याममुळे मी हतबल झालो”     

Tags: jaywant wadkarJaywant Wadkar On Worli Hit and Run Casemarathi actor
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Famous Actress and Actor Wedding News
Entertainment

“सुपारी फुटली, लग्न ठरलं” सुप्रसिद्ध अभिनेत्री-अभिनेता अडकणार लग्नबंधनात; सोशल मीडियावर VIDEO VIRAL

एप्रिल 21, 2026 | 4:28 pm
dipika kakar two new cysts
Entertainment

कॅन्सर सर्जरीनंतर दीपिका कक्करची तब्येत पुन्हा बिघडली, दुसऱ्यांदा झाला हा आजार, लेकाची वाटतेय काळजी

एप्रिल 20, 2026 | 3:46 pm
Atlee Baby Girl
Entertainment

सुप्रसिद्ध दिग्दर्शक दुसऱ्यांदा झाला बाबा, घरी आली चिमुकली परी, स्पेशल पोस्टद्वारे दिली गुडन्यूज

एप्रिल 20, 2026 | 12:34 pm
 Deepika Padukone pregnant
Entertainment

४० व्या वर्षी दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण, प्रेगन्सी किटद्वारे दिली गुडन्यूज, लेक दुवाचीही दिसली झलक

एप्रिल 20, 2026 | 11:48 am
Next Post
25 august 2024 Saturday daily horoscope marathi news bhavishyavani astrology 12 zodiac sign know more

25 August Horoscope : वृषभ, कन्या आणि कर्क राशीसाठी रविवारचा दिवस आनंददायी, कुणाच्या नशिबात काय? जाणून घ्या...

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.