मराठी नाटक, चित्रपट, मालिका अशा विविध माध्यमातून अभिनेता अभिजीत केळकरने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. मालिकाविश्वामुळे अभिजीतला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. मात्र नाटकविश्वापासून अभिजीतने त्याचा सिनेसृष्टीतील प्रवास सुरु केला. मात्र सिनेविश्वातील त्याचा हा प्रवास काही सोप्पा नव्हता. अनेक अडचणींचा सामना करत अभिजीतने सिनेसृष्टीतील स्वतःच स्थान स्वतः निर्माण केलं. या प्रवासादरम्यानचा एक किस्सा अभिजीतने नुकत्याच दिलेल्या ‘कॉकटेल स्टुडिओ’ येथे सांगितला आहे. यावेळी बोलताना अभिजीतने त्याच्या अभिनय क्षेत्राच्या निवडीला घरच्यांचा विरोध असल्याचही सांगितलं. (Abhijeet Kelkar Incident)
अभिजीत यावेळी बोलताना असं म्हणाला की, “मी एका केटरिंग कंपनी होती. आणि मी चांगल्या पोस्टला होतो. जर मी तिथेच काम केलं असत तर आता चांगल्या पोस्टला असतो. पण मला मनापासून वाटत होत की, मी ऍक्टरच व्हायचं होत आणि ते कायम होतं. आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा, प्रोयोगिक नाटक, व्यावसायिक नाटक, मालिका, चित्रपट अशी रांग होती. ही रांग मी माझ्या आयुष्यात पूर्ण केली नाही. मी नोकरी करत होतो पण मी खुश नव्हतो. माझा मित्र एकदा मला भेटला. तो मला एकदा रस्त्यात भेटला. त्याला मी म्हणालो मी एक नाटक करत आहे. त्यात एक रिप्लेसमेंट हवी आहे तू काम करशील का?. नाटक करायला मिळतंय म्हणून मी होकार दिला. सध्या तरी नाटकाचे प्रयोग कमी आहेत असं तो मला म्हणाला. यावर मी करतोय असं म्हटलं”.
“मला नाटक करायला मिळणार आहे या विचाराने मी सुरु केलं.जॉब करुन मी नाटक केलं. त्याचं संस्थेचं दुसरं नाटक करायची संधी चालून आली. दोन नाटकांचे प्रयोग वगैरे असल्याने नोकरी सांभाळणं कठीण झालं. त्यावेळी साजिद खान नावाचे माझे बॉस होते त्यांनी मला बोलावून घेतलं आणि अभिनय कर जॉब नको करु सांगितलं. दोन्हीकडे तुझी धावपळ होणार. एकावर फोकस कर असा सल्ला त्यांनी दिला. त्यांनी मला चार-सहा महिने समजून घेतलं होतं. माझा विचार पक्का होता पण घरी कस सांगायचं हा मोठा प्रश्न होता. मी माझ्या घरी सांगितलं की मला अभिनेता व्हायचं आहे. माझ्या जवळची व्यक्ती माझी मावशी होती. मी सगळ्यात आधी तिला सांगितलं. आणि तिच्याकडून मला नकार दिला. त्यामुळे हा प्रश्न मला गंभीर वाटू लागला. पण मला हेच करायचं होतं. मग मी घरी सांगितलं मी जॉब सोडतोय. माझ्याकडे दोन नाटक आहेत आणि त्याचे इतके पैसे मिळणार आहेत. हे ऐकल्यावर घरुन पहिला प्रश्न आला की, ते नाटक बंद पडलं तर?.
आणखी वाचा – लग्नाला सहा महिने पूर्ण होताच प्रथमेश परबने बायकोबरोबरचा शेअर केला रोमँटिक व्हिडीओ, पाहा Unseen Moments
पुढे तो असंही म्हणाला की, “माझे आई बाबा सरकारी नोकरी करत असल्याने तशी कधी गैरसोय झाली नाही. तर माझ्या घरुन अभिनयासाठी प्रचंड विरोध झाला. घरुन नकार दिला. आईचा मला पाठिंबा होता आणि अजूनही आहे. माझे बाबा खूप कडक, शिस्तप्रिय आहेत आणि अर्थात त्यांना ते पटण्यासारखं नव्हतं. आता माझी काम पाहिल्यावर ते कौतुक करतात. पण वडील आणि मुलात नाही पटत ते अजूनही तसेच आहे. एक पॉईंट असाही आला की आमच्या घरात खूप खूप भांडण झालं आणि मी आत्महत्या करायचा प्रयत्न केला. त्यातून मी कसाबसा वाचलो. मग मी तीन-चार दिवस हॉस्पिटलमध्ये होतो. ते झाल्यानंतर आमची मिटिंग झाली. माझ्या मित्रांनी सल्ला दिला. आता तू घरात राहायचं नाही तू घरातून बाहेर पड मग बाकीचं नंतर बघू. तेव्हा मी घराबाहेर राहायचं ठरवलं आणि मी मित्राच्या ओळखीने बाहेर राहू लागलो. आणि तिथून माझा खरा प्रवास झाला”.