शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“परकर पोलक्यातल्या पारूला हलक्यात घेऊ नका”, अनुष्काला पारूने धमकावलं, धडा शिकवायला कोणता डाव आखणार?

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 22, 2025 | 2:00 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Paaru Marathi Serial

"परकर पोलक्यातल्या पारूला हलक्यात घेऊ नका", अनुष्काला पारूने धमकावलं, धडा शिकवायला कोणता डाव आखणार?

Paaru Marathi Serial : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेला प्रेक्षक भरभरुन पाठिंबा देताना दिसत आहेत. मालिकेत एकामागोमाग एक रंजक ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. दिशा आणि अनुष्काच्या एन्ट्रीने मालिकेला एक वेगळंच वळण आलं आहे, तर पारूने दोघींचा डाव ओळखला असून ती वेळोवेळी त्यांना रंगेहात पकडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. मात्र, दिशा व अनुष्का या पारूला वरचढ ठरत आहेत. या सगळ्याच्या पलीकडे जात आता पारू अनुष्काचा डाव सगळ्यांसमोर आणणार असल्याचं समोर आलं आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये पारू अनुष्काला ताकीद देताना पाहायला मिळणार आहे. दिशाच्या मदतीने अनुष्काने किर्लोस्करांच्या नायनाट करण्याचं ठरवलं आहे.

तीन महिने जेलमध्ये राहिल्यानंतर दिशा किर्लोस्कर कुटुंबाचा सर्वनाश करण्यासाठी आली आहे. शिवाय अनुष्का दिशाच्या अपमानाचा बदला घ्यायला किर्लोकारांच्या घरात शिरली आहे. याची सुरुवात दोघीही पारूला संपवून करताना दिसणार आहेत. मात्र पारू वेळोवेळी अनुष्का आणि दिशा यांचा डाव पलटवताना दिसत आहे. “जोपर्यंत मी जिवंत आहे, तोपर्यंत मी तुमच्या आणि किर्लोस्कर कुटुंबामधील भिंत बननू उभी राहिन”, अशी सक्त ताकीद पारूने दिली होती.

आणखी वाचा – Video : फुलांच्या पायघड्या, दिव्यांची रोषणाई अन्…; अंकिता वालावलकरचं सासरी जंगी स्वागत, सेल्फीसाठीही शेजारच्यांची गर्दी

View this post on Instagram

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

अशातच मालिकेचा एक प्रोमो समोर आला आहे. ज्यामध्ये अनुष्का पारूला धमकावताना दिसत आहे. अनुष्का पारूला म्हणतेय की, “जा तुझ्या देवी आईला दिशा आणि माझं सत्य जाऊन सांग आणि त्यानंतर माहितीये ना तुला”. यावेळी अनुष्का पारूच्या मंगळसूत्राला हात लावते. त्यामुळे पारूचा राग अनावर होतो. पारू अनुष्काचा हात चांगलाच पिरगळवते आणि म्हणते, “माझ्या मंगळसूत्राला हात लावायचा नाही. अनुष्का मॅडम एक लक्षात ठेवा, या परकर पोलक्यातल्या पारूला हलक्यात घेऊ नका. आतापर्यंत तुम्ही डाव जिंकलात आणि खेळीपण तुम्हीच केलात. आता बारी आहे पारूची”.

आणखी वाचा – “कोणताही पुरावा नसताना…”, शिर्केंच्या वंशजांचा ‘छावा’वर आक्षेप, थेट दिग्दर्शकाला केलं आवाहन, म्हणाले, “महाराष्ट्रात फिरणं बंद करु आणि…”

पारूची ही धमकी ऐकून अनुष्काच्या चेहऱ्यावरचा रंगच उडतो. पारू मालिकेचा हा प्रोमो पाहून नेटकऱ्यांनी मालिकेला पसंती दर्शविली आहे. पारूचा घाबरटपणा अनेकांना खटकत होता आता मात्र पारूच धीटाने बोलणं अनेकांच्या पसंतीस पडलं आहे. “कधीतरी हिरोईन असल्यासारखी वागली बाबा”, “आली पारू तिच्या रूपात”, “पारू द डॉन”, अशा कमेंट करत मालिकेच्या प्रोमोला पसंती दर्शविली आहे.

Tags: marathi serialpaaru marathi serialpaaru new promo
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

filmmaker Manish Gupta stabbed driver
Entertainment

धक्कादायक! बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध दिग्दर्शकाचा ड्रायव्हरवर चाकूने हल्ला, जागीच कोसळला अन्…; संपूर्ण घटना समोर

जून 7, 2025 | 11:13 am
Dia Mirza Pregnancy
Women

…अन् गरोदरपणात दिया मिर्झाला झाला नको तो संसर्ग, लेकाच्या जीवावरही बेतलं, ३६ तासांनी शस्त्रक्रिया झाली आणि…

जून 7, 2025 | 10:00 am
Aamir khan talk about his girlfriend
Entertainment

“प्रेम लपवणं म्हणजे तिचा अपमान”, ६०व्या वर्षी तिसऱ्यांदा प्रेम, गर्लफ्रेंडबाबत बोलला आमिर खान, नातं जगजाहिर केलं कारण…

जून 6, 2025 | 7:00 pm
Anushka Sharma And Virat Kohli
Entertainment

IPLमध्ये विराट कोहलीचा विजय पण अनुष्का शर्मा झाली श्रीमंत, तब्बल इतकी आहे संपत्ती, एकूण कमाई…

जून 6, 2025 | 6:00 pm
Next Post
Poonam Pandey Viral Video

अज्ञात व्यक्तीकडून किस करण्याचा प्रयत्न अन्…; पूनम पांडेच्या 'त्या' व्हायरल व्हिडीओची चर्चा, नेटकरी म्हणाले, "जनतेला फसवण्याचा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.