Ankita Walawalkar Gruhpravesh Video : मराठी सिनेविश्वात चर्चा रंगलेली पाहायला मिळाली ती म्हणजे ‘बिग बॉस’ फेम आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकणहार्टेड गर्ल अंकिता वालावलकर हिच्या लग्नाची. अगदी शाही थाटामाटात अंकिता वालावलकर व कुणाल भगत यांचा लग्नसोहळा पार पडला. भव्य दिव्य अशा या शाही विवाहसोहळ्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. चाहत्यांनी त्यांच्या या शाही विवाहसमारंभाचे तोंडभरुन कौतुक केले. अंकिताने कोकणात तिच्या मूळ गावी देवबाग येथे लग्न केले. देवबाग येथील लक्ष्मी नारायण मंदिरात अंकिता व कुणाल यांनी सातफेरे घेतले. जवळचे नातेवाईक, कुटुंबीय आणि मित्र परिवार यांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा अगदी दणक्यात पार पडला. अंकिता व कुणालच्या लग्नाचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
आता लग्नानंतर अंकिता तिच्या सासरी गेली आहे. कुणाल भगत हा मूळचा रायगड जिल्ह्यातील माणगांव येथील आहे. लग्नानंतर आता कुणाल अंकिताला मालवणहून घेऊन घरी परतला आहे. सासरी येताच अंकिताचे जोरदार स्वागत झाले असल्याचा व्हिडीओ अंकिताने इंस्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केला आहे. माणगावच्या घरी गृहप्रवेश असं कॅप्शन देत अंकिताने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अंकिता व कुणालच्या गृह्प्रवेशावेळीची खास झलक पाहायला मिळत आहे. शिवाय दोघांचे उखाणेही लक्षवेधी ठरत आहेत.
गृह्प्रवेशासाठी अंकिताच्या सासरी फुलांच्या पायघड्या घालण्यात आलेल्या पाहायला मिळाल्या. इतकंच नाही तर दिव्यांची रोषणाईही केलेली पाहायला मिळाली. तसेच या व्हिडीओमध्ये घरी येताच अंकिता व कुणाल यांची नजर काढण्यात आलेली पाहायला मिळाली. आणि औक्षण करुन त्यांचं स्वागत केलं. गृह्प्रवेशावेळी अंकिताने कुणालसाठी खास उखाणा घेतला. अंकिता म्हणाली, “सागरकिनारी जुळल्या गाठी, कुणालचं नाव घेते साताजन्मासाठी”. यावर सगळ्यांनी अंकिताचं टाळ्या वाजवत कौतुक केलं.
आणखी वाचा – पंतप्रधान मोदींनाही ‘छावा’ची भुरळ, विकी कौशलच्या चित्रपटाचं तोंडभरुन कौतुक, म्हणाले, “महाराष्ट्र आणि मुंबई…”
तर गृह्प्रवेशावेळी कुणालनेही अंकितासाठी खास उखाणा घेतला. कुणाला म्हणाला, “सरीवर सरी पावसाच्या सरी, अंकिताच माझी कोकणपरी”. कुणालचा हा उखाणाही साऱ्यांना आवडला. त्यानंतर माप ओलांडत अंकिताने घरात गृह्प्रवेश केला. त्यानंतर आजूबाजूच्या लहान मुलांनी अंकितासमोर सेल्फीसाठी घोळका केलेला पाहायला मिळाला. हा व्हिडीओ पाहून अंकिताने सासरी जाताच साऱ्यांची मन जिंकली. आणि ती खूप आनंदी असलेली पाहायला मिळाली.