Paaru Marathi Serial New Promo : ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘पारू’ या मालिकेत एका मागोमाग एक रंजक वळण येताना पाहायला मिळत आहेत. ‘पारू’ या मालिकेत आलेल्या रंजक वळणांनी ही मालिका एका उंचीवर नेऊन ठेवली आहे. मालिकेत सध्या प्रीतम व दिशाची लगीन घाई सुरु असलेली पाहायला मिळतेय. तर इकडे आदित्य व पारू हे लग्न कसे थांबवता येईल याकडे लक्ष देताना दिसत आहेत. मालिकेत दिशा व प्रीतमचं लग्न लागत असतानाचा एक प्रोमो समोर आला आहे. समोर आलेल्या या प्रोमोमध्ये अखेर दिशाचा पर्दाफाश झाला असल्याचं समोर आलं आहे. दिशाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आला असून अनेकांनी या प्रोमोवर कमेंट करत पसंती दर्शवलेली पाहायला मिळतेय.
समोर आलेल्या प्रोमोमध्ये असं पाहायला मिळत आहे की, प्रीतम दिशाच्या गळ्यात वरमाला घालायला जाणार इतक्यात पारू तिकडून येते आणि जोरात ‘थांबा’ असं म्हणते. यावेळी पारूच्या डोक्याला जखमा झालेल्या असतात. पारूला पाहून दिशा चकित होते आणि म्हणते, “पारू तू इथे”. तेव्हा पारू सांगते की, “दिशा मॅडम तुमचा खेळ संपला आहे. तुमचा खरा चेहरा हा सर्वांसमोर आला आहे”. हे ऐकून दिशा पारूवर रागावते आणि म्हणते, “आता तुला तर मी सोडणार नाही पारू”. असं म्हणत ती पारूच्या कानाखाली मारायला जाते, इतक्यात दिशाचा हात अहिल्यादेवी अडवतात.
आणखी वाचा – Video : अभिजीत सावंतचं जोरदार कमबॅक, तब्बल ७० दिवसांनी स्टेज परफॉर्मन्स केला अन्…; म्हणाला, “नवीन सुरुवात…”
अहिल्या देवी दिशाच्या सणसणीत कानाखाली लगावतात आणि म्हणतात, “थांबव तुझी ही सगळी नाटकं. तुझं खरं रुप आलंय आमच्यासमोर. तू माझं घर उद्ध्वस्त करायला निघाली होतीस”, असं म्हणत तिला जाब विचारतात. अखेर पारुमुळे दिशाचा खरा चेहरा समोर आलेला मालिकेत पाहायला मिळतोय. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी कमेंट करत पसंती दर्शविली आहे.
आणखी वाचा – आलिया भट्ट दुसऱ्यांदा आई होण्यासाठी तयार?, स्वतःचं केला खुलासा, म्हणाली, “खूप मुलं हवीत आणि…”
“विजया दशमीच्या दिवशी दृष्ट शक्तीचा नाश होणार”, “खुप दिवस बघत होतो, या दिशाचा पर्दाफाश कधी होणार. पारु मॅडममुळे किर्लोस्कर कुंटुबावरचे संकट टळले”, “हेच तर हवं होत, आणि तेच झालं”, “प्रीतमचे हाल बघीतले जात नव्हते पण काय करणार आम्ही पण काही करु शकलो नसतो”, अशा अनेक कमेंट करत पारूचं कौतुक केलं आहे. शेवटी अहिल्यादेवींचं दिशा व प्रीतमचं लग्न मोडतात. आता दिशाला काय शिक्षा मिळणार?, दिशाची किर्लोस्कर घरातून कशी हकालपट्टी होणार हे पाहणं मालिकेत रंजक ठरेलच, पण प्रिया व प्रीतम कसे एकत्र येणार याच प्रेक्षकांना उत्सुकता लागून राहिली आहे.