सध्या सर्वत्र ‘बिग बॉस १८’ ची चर्चा सुरू आहे. हे पर्व सुरु होऊन केवळ एकच आठवडा पूर्ण झाला आहे. मात्र या पर्वातील एका सदस्याची तुलना ‘बिग बॉस १३’चा विजेता सिद्धार्थ शुक्लाबरोबर केली जात आहे. या कार्यक्रमाच्या ग्रँड प्रीमियरच्या वेळीदेखील सलमान खानने विवियनला अंतिम स्पर्धक म्हणून सांगितले होते. पण विवियनची तुलना केलेली त्याची पत्नी नुरानला आवडले नाही. तिने विवियन व सिद्धार्थ यांच्या तुलनेवर प्रतिक्रिया देत स्वतःचे मत व्यक्त केले आहे. त्यामुळे सोशल मीडियावर सर्वत्र याच प्रकरणाची चर्चा सुरू असलेली पाहायला मिळत आहे. (vivian dsena wife post)
बिग बॉसमधील माजी स्पर्धक राजीव आदतीयाने एक पोस्ट शेअर केली होती. यामध्ये त्याने विवियनला पाहिलं की सिद्धार्थची आठवण येत असल्याचे म्हंटले आहे. त्यानंतर सिद्धार्थच्या चाहत्यांनीदेखील याला दुजोरा दिला तसेच काहींनी याचा विरोध दर्शवला आहे. काही म्हणाले की, “सिद्धार्थला कोणीही टक्कर देऊ शकत नाही”. यानंतर विवियनच्या पत्नीनेदेखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये तिने विवियन व सिद्धार्थ यांचा एक फोटो शेअर केला आहे.
सिद्धार्थ व विवियन यांचा फोटो शेअर करत नुरनने लिहिले की, “मी विवियनच्या सर्व चाहत्यांना विनंती करते की सिद्धार्थ व विवयण यांची तुलना करणं बंद करा. दोघांनीही त्यांचा प्रवास एकत्रित सुरू केला होता. त्यांच्यामध्ये खूप चांगले संबंध होते. दोघांनीही एकमेकांबद्दल कधीही चुकीचा विचार केला नाही. तसेच त्यांच्यामध्ये कधीही कोणतेही वाददेखील झाले नाहीत”.
पुढे तिने लिहिले की, “खरंतर विवयन व सिद्धार्थ दोघंही चांगले मित्र होते. दोघांनी अनेक सुपरहिट मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांचे व्यक्तिमत्त्व सारखे असले तरीही त्यामुळे काहीही फरक पडत नाही. पण जो आपल्यात नाही त्याच्याबद्दल आदर करा”. दरम्यान नुरनची ही पोस्ट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तसेच सिद्धार्थ शुक्लासारखं कोणीही होऊ शकत नाही असं म्हंटलं जात आहे.