रविवार, जून 14, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

डॉक्टरांनी बरिणीभर गाठी काढल्या, गोळ्यांची एलर्जी आणि…; ‘पारू’ फेम अभिनेत्याच्या पत्नीचा कठीण काळ, कर्करोगाने त्रासल्या…

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 24, 2025 | 10:30 am
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
vijay patwardhan wife

डॉक्टरांनी बरिणीभर गाठी काढल्या, गोळ्यांची एलर्जी आणि...; 'पारू' फेम अभिनेत्याच्या पत्नीचा कठीण काळ, कर्करोगाने त्रासल्या...

vijay patwardhan wife : मराठी कलाविश्वात अशी बरीच कलाकार जोडपी आहेत ज्यांनी आजवर त्यांच्या अभिनयाने रसिकांच्या मनात घर केलं आहे. या जोड्यांपैकी एक म्हणजे विजय पटवर्धन आणि वृषाली पटवर्धन. अनेक मालिका, नाटक, चित्रपट यांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारत या जोडीने रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. सध्या विजय पटवर्धन झी मराठी वाहिनीवरील पारू या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिकेत आहेत. मालिकेत ते आदित्यच्या वडिलांच्या भूमिकेत म्हणजेचं श्रीकांत किर्लोस्कर ही भूमिका साकारत आहेत. पटवर्धन जोडप्याला सिनेसृष्टीत काम करत असताना वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक अडचणींचा सामना हा करावा लागला.

विजय पटवर्धन व त्यांच्या पत्नी वृषाली यांनी नुकतीच ‘रसिकमोहिनी’ या युट्युब चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी वृषाली यांनी त्यांच्या आजारपणाचा कठीण काळ सांगितला. वृषाली म्हणाल्या, “मला दुसऱ्या स्टेजच्या कर्करोगाचं निदान झालं होतं. ज्यावेळी स्कॅनिंगचा रिपोर्ट आला तेव्हा फक्त तीन गाठी दिसल्या होत्या. पण, आठवड्याभराने जेव्हा माझं ऑपरेशन करण्यात आलं तेव्हा २९ गाठी होत्या. डॉक्टरांनी बरणीभरुन काढलेल्या त्या गाठी माझ्या दादाच्या हातात आणून दिल्या होत्या कारण लॅबमध्ये त्या गाठींची पुढील तपासणी होणं बाकी होतं. ज्यावेळी माझं ऑपरेशन होतं त्यावेळी तो (विजय पटवर्धन) शूटिंगला होता. खरंतर, मीच त्याला शूटिंगला पाठवलं होतं. मी निवांत होते, फार गोष्टी मनावर घेतल्या नव्हत्या”.

आणखी वाचा – महागडं हॉटेल, रिसॉर्टला न जाता नाटकाच्या सेटवर वनिता खरातच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन, कुटुंबियांसहही धमाल, व्हिडीओ व्हायरल

“ऑपरेशनच्या आदल्या दिवशी भूलरोग तज्ज्ञ मला भेटायला आले होते. त्यांनी मला काय-काय होईल याची माहिती दिली. कोणत्या गोळ्यांची एलर्जी वगैरे नाही ना असं सगळं विचारलं. तेव्हा मी त्यांना म्हणाले होते, एलर्जी वगैरे काही नाही फक्त माझी इतकी ऑपरेशन्स झाली आहेत की, साधारण माणसाला भूल देण्यासाठी तुम्ही जर ५ एमएल औषध वापरलं जातं तर मला ते औषध १० एमएल लागेल. माझं उत्तर ऐकून डॉक्टर हसायला लागले होते”, असा आजारपणातील गमतीशीर किस्सा त्यांनी सांगितला.

आणखी वाचा – ‘शिवा’ मालिका बंद होणार?, पूर्वा कौशिकच्या ‘त्या’ इंस्टाग्राम स्टोरीने चर्चांना उधाण, प्रेक्षकांचीही नाराजी

नर्मदा परिक्रमेबद्दल सांगताना अभिनेत्री पुढे म्हणाल्या, “ऑपरेशन झाल्यानंतर कॅन्सरवरील पुढची ट्रीटमेंट सुरु असताना मी नर्मदा परिक्रमा पूर्ण करण्याचं ठरवलं. मी डॉक्टरांना विचारलं होतं, त्यांचा सल्ला घेतला. त्यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार मी बसने ही परिक्रमा पूर्ण करायचं ठरवलं. मी ज्या संस्थेकडून गेले होते त्यांनीही माझी खूप काळजी घेतली. जानेवारी २०२५ मध्ये मी परिक्रमा पूर्ण कैली. ही यात्रा करण्यामागे अनेक कारणं होतं. माझ्या वडिलांना अचानक कॅन्सरचं निदान झालं होतं, त्यात त्यांचं निधन झालं. त्यानंतर मलाही कॅन्सरचं निदान झालं. यातून आम्ही सावरलो नाही तोपर्यंत माझ्या दादालाही कॅन्सरचं निदान झालं. त्यामुळे कितीही उपचार सुरु असले तरीही मला स्वत:साठी एक वेळ हवा होता. मला एकटीलाच जायचं होतं. त्या संपूर्ण प्रवासात मी डायरी लिहायचे. घरी येऊन मी विजयला जेव्हा ते सगळं दाखवलं तेव्हा तो म्हणाला आपण याचं पुस्तक करुयात का? मग तिथून पुस्काची संकल्पना पुढे आली”.

Tags: marathi actorpaaru actorvijay patwardhan
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

krishnai chya leki serial
Entertainment

संगममाऊली घाटावर रंगला ‘कृष्णाईच्या लेकी’चा आगळावेगळा शुभारंभ, नव्या मालिकेची उत्सुकता

जून 12, 2026 | 4:40 pm
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah
Entertainment

‘तारक मेहता…’च्या पोपटलालचं खऱ्या आयुष्यात झालंय लग्न, कुटुंबांच्या विरोधात जाऊन केलाय प्रेमविवाह

जून 12, 2026 | 10:19 am
rs 370 biryani controversy
Entertainment

‘३७० रुपयांची बिर्याणी’ प्रकरण पडलं महागात, कॉमेडियन प्रणित मोरेला राष्ट्रीय महिला आयोगाकडून नोटीस, प्रकरण काय?

जून 12, 2026 | 9:58 am
Arjun Rampal interview
Entertainment

२० वर्षांचा संसार मोडला, आईचं कॅन्सरने निधन आणि…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याने सांगितला आयुष्यातील कठीण काळ, म्हणाला…

जून 10, 2026 | 11:50 am
Next Post
Boni Kapoor Waight

बोनी कपूर यांना ओळखणंही झालं कठीण, बदलता लूक पाहून चाहत्यांनाही धक्का, वजन इतके कमी…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.