शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

महागडं हॉटेल, रिसॉर्टला न जाता नाटकाच्या सेटवर वनिता खरातच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन, कुटुंबियांसहही धमाल, व्हिडीओ व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
जुलै 22, 2025 | 1:45 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
vanita kharat news

महागडं हॉटेल, रिसॉर्टला न जाता नाटकाच्या सेटवर वनिता खरातच्या वाढदिवसाचे जंगी सेलिब्रेशन, कुटुंबियांसहही धमाल, व्हिडीओ व्हायरल

vanita kharat news : अभिनेत्री वनिता खरातने या सिनेक्षेत्रात स्वतःचं स्थान स्वतः निर्माण केलं आहे. वनिता खरातचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. वनिता खरात ही छोट्या पडद्यावरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमामुळे घराघरात पोहोचली. ‘कोळीवाड्याची रेखा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वनिताने तिच्या दमदार अभिनयातून प्रेक्षकांची मने जिंकली आहे. त्यामुळेच आज तिचा स्वतःचा असा चाहतावर्ग निर्माण झाला आहे. वनिताने केवळ मालिकेपुरतं मर्यादित न राहता आपला मोर्चा चित्रपटांकडे वळवला आणि त्यात प्रेक्षकांची मने जिंकण्यात तिला यश आले.

सोशल मीडियावरही वनिता खरात बऱ्यापैकी सक्रिय असते. नेहमीच ती काही ना काही पोस्ट करुन चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अशातच अभिनेत्रीने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलेल्या एका पोस्टने साऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. वनिताने शेअर केलेल्या या पोस्टमध्ये तिने तिच्या वाढदिवसाचे खास सेलिब्रेशन दाखवले आहे. वनिताचा ३१ वा वाढदिवस होता. आणि याच दिवशी तिच्या ‘ठरता ठरता ठरेना’ या नाटकाचा प्रयोगही होता. त्यामुळे मंच, प्रेक्षक, जवळची माणसं, सहकलाकार, मित्रपरिवार या सगळ्यांबरोबर तिने तिचा वाढदिवस साजरा केला.

आणखी वाचा – ‘लग्नानंतर होईलच…’ फेम ज्ञानदा रामतीर्थकर रुग्णालयात भरती, बेडवरील फोटोही केला शेअर, म्हणाली, “गेले काही दिवस…”

View this post on Instagram

A post shared by Vanita Kharat (@vanitakharat19)

या खास सेलिब्रेशनची झलक शेअर करत तिने कॅप्शन देत असं म्हटलं आहे की, “३१वा वाढदिवस. रंगमंचावर गेला. १९/०७/२०२५. आजचा दिवस खास होता. कारण तो कामात गेला, स्वप्नांसह गेला, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो प्रेक्षकांच्या प्रेमात गेला. मी कलाकार आहे. रंग, प्रकाश, शब्द, हालचाली यांच्यात मी माझं आयुष्य वाहिलं आहे. वाढदिवस असो की कोणताही दिवस, माझ्यासाठी खरी भेट म्हणजे प्रेक्षकांनी केलेल्या टाळ्यांचा आवाज, डोळ्यातलं समाधान, आणि मनातून आलेली दाद. हेच प्रेम मिळालं आज. त्यामुळे वाटतं प्रत्येक दिवस हा एक नवा वाढदिवसच असावा”.

आणखी वाचा – “मी एकटाच लघवी प्यायलो म्हणून…”, स्वतःचीच लघवी पिण्यावरुन ट्रोल होताच परेश रावल स्पष्टच बोलले, म्हणाले, “उगाच वाढवून…”

पुढे तिने असं म्हटलं आहे की, “जिथे काम असावं, कला असावी, आणि तुमचं असं भरभरुन प्रेम असावं. या प्रवासात साथ देणारा माझा मित्र परिवार, कुटुंब,रसिक प्रेक्षक यांचे मनापासून आभार. माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. ३१ पूर्ण आणि प्रवास अजून सुंदर होणार आहे”. वनिताच्या या पोस्टला प्रेक्षकांची भरभरून पसंती मिळाली आहे. आणि कमेंट करत तिच्यावर शुभेच्छांचा वर्षावही केला आहे.

स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bigg Boss Marathi 6 Controversy
Entertainment

स्वयंपाक घरात उंदीर, टॉवेल, रेझर शेअर केले आणि…; ‘बिग बॉस मराठी ६’मधून बाहेर येताच स्पर्धकाने दाखवली परिस्थिती, म्हणाली, “स्किन इन्फेक्शन…”

एप्रिल 18, 2026 | 2:00 pm
Siddharth Venugopal actor death news
Entertainment

सुप्रसिद्ध साऊथ अभिनेत्याचे कॅन्सरने निधन, वयाच्या ४१व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीला धक्का

एप्रिल 18, 2026 | 1:28 pm
Akshaya Tritiya 2026
Lifestyle

अक्षय तृतीया 2026 च्या लक्ष्मीपूजनासाठी घराची तयारी कशी कराल?, दरवाजे, खिडक्या, आरसे…

एप्रिल 18, 2026 | 12:16 pm
how sleep can impact heart health
Lifestyle

झोपेच्या कमतरतेमुळे डायबिटीस, हृदयविकार, लठ्ठपणा, मानसिक समस्यांचा धोका वाढतो, जाणून घ्या यावर उपाय…

एप्रिल 18, 2026 | 11:50 am
Next Post
Shiva Serial Off Air

'शिवा' मालिका बंद होणार?, पूर्वा कौशिकच्या 'त्या' इंस्टाग्राम स्टोरीने चर्चांना उधाण, प्रेक्षकांचीही नाराजी

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.